पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत बुद्धिमान व्यक्ती; रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे कौतुकोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत बुद्धिमान व्यक्ती; रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे कौतुकोद्गार

मॉस्को; पुढारी वृत्तसेवा :  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत बुद्धिमान व्यक्ती असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जोरदार प्रगती करीत असल्याचे कौतुकोद्गार रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काढले आहेत. बुधवारी ते एका कार्यक्रमात बोलत होते.

मोदी यांच्या कामाचे कौतुक करतानाच रशिया आणि भारत यांनी आर्थिक सुरक्षेसह सायबर गुन्हेगारीविरोधात वज्रमूठ उगारली पाहिजे. रशियाला भारताकडून अधिकाधिक सहकार्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील संबंधांवरही भाष्य केले. मोदी यांच्यासोबत आमचे राजकीय संबंध उत्तम आहेत, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news