Rs 2000 Bank Note: २ हजारांच्‍या नोटा जमा करण्‍याची मुदत वाढवली; RBI चा मोठा निर्णय | पुढारी

Rs 2000 Bank Note: २ हजारांच्‍या नोटा जमा करण्‍याची मुदत वाढवली; RBI चा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क: दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय अलिकडेच केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार या नोटा बँकांमध्‍ये जमा करण्याचा कालावधी आज (दि.३० सप्टेंबर) संपला होता. दरम्यान ,या संदर्भात आरबीआयने (RBI) मोठा निर्णय घेतला आहे. २ हजारांच्‍या नोटा जमा घेण्याच्या कालावधी वाढवण्यात आला असून, शनिवारी ७ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत २ हजारांच्‍या नोटा बँकेत जमा करण्‍यात येणार आहेत, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (Rs 2000 Bank Note)

संबंधित बातम्या:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 19 मे रोजी दोन हजारची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत आज संपली, यानंतर रिझर्व्ह बँकने आज निवेदनाद्वारे २ हजार नोटा बदलीची मुदत वाढवल्याचे स्पष्ट केले. (Rs 2000 Bank Note)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नोव्हेंबर २०१६ साली दोन हजारच्या नोटा चलनात आणल्या होत्या. दरम्यान 26, 28, 29 आणि 30 सप्टेंबर तसेच 2 ऑक्टोबर या दिवशी बँकांना सुट्टी असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे म्हटले जात आहे. (Rs 2000 Bank Note)

हेही वाचा:

 

Back to top button