Bhogal jewellery shop theft : दिल्लीतील भोगल दरोडाप्रकरणी दोघांना अटक: १२ लाख रोकड, १८ किलो सोने जप्त | पुढारी

Bhogal jewellery shop theft : दिल्लीतील भोगल दरोडाप्रकरणी दोघांना अटक: १२ लाख रोकड, १८ किलो सोने जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील भोगल भागात २५ कोटींच्या दरोडाप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी शुक्रवारी (दि.२९) बिलासपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू असून एका आरोपीकडून 12.50 लाख रुपये रोख आणि 18 किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती बिलासपूरचे एसपी संतोष सिंह यांनी दिली. (Bhogal jewellery shop theft)

दिल्लीतील भोगल भागात एका ज्वेलरी दुकानात घुसून तीन जणांनी रविवारी 25 कोटी रुपयांचे सोने आणि रोकड लुटली होती. देशाच्या राजधानीतील हा सर्वात मोठा दरोडा आहे. आरोपींनी दुकान फोडून स्ट्राँग रुमला छिद्र पाडून २५ कोटींहून अधिक किमतींचे दागिने तसेच ५ लाखांची रोकड लंपास केली. (Bhogal jewellery shop theft)

दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करण्यापूर्वी आतमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले होते. भोगल येथील उमराव सिंग ज्वेलर्सचे मालक रविवारी रात्री ८ च्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी दुकान बंद असते. मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दुकान उघडले असता त्यांना या घटनेची माहिती मिळाली.

हेही वाचा 

Back to top button