Hingoli Crime News : खटकाळी रेल्वेपटरी जवळील खूनाचा दोन तासांत छडा, एकाला अटक

file photo
file photo
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील खटकाळी रेल्वेपटरी जवळ झालेल्या खून प्रकरणाला हिंगोली शहर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अवघ्या दोन तासांत वाचा फोडली. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या अधिक चौकशीत त्याने खुनाची कबुली दिल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. (Hingoli Crime News)

शहरालगत खटकाळी रेल्वेपटरी भागात एका तरूणाचा मृतदेह आढळला असून त्याची दुचाकी बाजूला पडलेली गुरुवारी (दि.२८) सकाळी आढळून आली होती. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, संभाजी लेकुळे, धनंजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (Hingoli Crime News)

मृतदेह तरुण अरबाज खान (वय २२. रा. आझम कॉलनी, हिंगोली) याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या पोटावर, मानेवर, पाठीवर चाकुचे वार असल्याचे आढळून आले. तसेच गळा चिरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी श्‍वान पथकाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, श्‍वान पथक घटनास्थळावरच घुटमळले. त्यामुळे खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते.

दरम्यान, पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून अरबाज खान हा कुठे गेला होता? त्याची माहिती घेण्यात सुरवात केली. यामध्ये इमरोज पठाण (रा. आझम कॉलनी) याची त्याच्याशी भेट झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी इमरोज पठाण यास अवघ्या दोन तासांत ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली. यामध्ये त्याने पैशांच्या देवाण घेवाणीवरून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी रात्री बिअर पिल्यानंतर खून केला आणि अंगावरील कपडे औंढा रस्त्यावर00 फेकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कोणी होते काय ? याची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news