

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील कश्मोर जिल्ह्याच्या कंधकोट तहसीलमधील मेहवाल शाह भाग स्फोटाने हादरला. एका घरात रॉकेट लाँचर शेलचा स्फोट होऊन चार मुलांसह नऊ जण ठार झाले आहेत. खेळणे समजून रॉकेट लाँचर मुलाने घरी नेल्यानंतर हा प्रकार घडल्याचे वृत्त पाकिस्तानमधील 'द डॉन'ने दिले आहे.
मुलांना खेळताना रॉकेट लाँचर शेल सापडलं…
कश्मोर-कंधकोटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) रोहिल खोसा यांनी सांगितले की, मुले मैदानात खेळत असताना त्यांना रॉकेट लाँचर सापडले. त्यांनी ते खेळण्यासाठी घरी नेले. घरी या रॉकेट लाँचर शेलशी मुले खेळत असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार मुले, दोन महिला आणि कुटुंबातील एका पुरुषासह आठ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सिंधचे मुख्यमंत्री न्यायमूर्ती मकबूल बकर यांनी प्रांतीय महानिरीक्षकांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. सिंध प्रांतातील कश्मोर जिल्ह्यातील कंधकोट तहसीलमधील जंगी सबजवाई गोठ गावात रॉकेट लाँचर कसे पोहोचले, या भागात शस्त्रास्त्रांची तस्करी होते का, असे सवाल त्यांनी केले आहेत.
काश्मोर-कंधकोटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) रोहेल खोसो यांनी मृतांमध्ये पाच मुले, दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याचे स्पष्ट केले आहे. जखमींना कंधकोट येथून लारकाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :