Maratha Reservation : कायदेशीर लढाईचे कारण सांगू नका; जरांगे-पाटील यांचा इशारा | पुढारी

Maratha Reservation : कायदेशीर लढाईचे कारण सांगू नका; जरांगे-पाटील यांचा इशारा

वडीगोद्री (जालना) :  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाच हजार पुरावे पुरेसे नाहीत का, असा सवाल करत कायदेशीर लढाईच्या नावाखाली आंदोलनाची दिशा बदलण्याचा डाव आखत असाल, तर हा डाव अजिबात यशस्वी होणार नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

जरांगे-पाटील यांनी मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर निघण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठवाड्यातील 65 लाख अभिलेखांपैकी 5 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आरक्षण देण्यासाठी या 5 हजार अभिलेखांचे पुरावे पुरेसे नाहीत का? आता हे 5 हजार पुरावे सरकारला सापडलेत ते सरसकट आरक्षण देण्यासाठी पुरेसे आहेत. तुम्ही वेळ मागितला. आम्ही दिला. आता पुरावे सापडले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे ते आता सरकारने ठरवले पाहिजे. 40 व्या दिवशी आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे. आता सरकारने बाकीची कारणे सांगू नयेत.

हेही वाचा : 

Back to top button