Lakhimpur Kheri violence case : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण; मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर | पुढारी

Lakhimpur Kheri violence case : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण; मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अंतरिम अटींमध्ये बदल केला आहे. आशिष मिश्रा यांना दिल्लीत जामीन, राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत.

आशिष मिश्रा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. तसेच, त्यांना प्रसारमाध्यमांना संबोधित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांच्या यूपीतील प्रवेशावरील बंदीही कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. वास्तविक, आशिष मिश्रा यांनी आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या मुलीवर उपचार करण्यासाठी दिल्लीत येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आशिष मिश्रा यांना पासपोर्ट आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

काय प्रकरण आहे

3 ऑक्टोबर 2021 रोजी, लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ लोक ठार झाले होते. जेव्हा शेतकरी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या या भागातील भेटीला विरोध करत होते. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एफआयआरनुसार, आशिष मिश्रा बसलेल्या एसयूव्हीने चार शेतकऱ्यांना चिरडले. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी चालक आणि भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता.

हेही वाचा 

Back to top button