Prime Minister Modi : व्हॉटस्अ‍ॅप चॅनलवर पंतप्रधानांचे फॉलोअर्स पोहोचले ५० लाखांवर | पुढारी

Prime Minister Modi : व्हॉटस्अ‍ॅप चॅनलवर पंतप्रधानांचे फॉलोअर्स पोहोचले ५० लाखांवर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : व्हॉटस्अ‍ॅपने चॅनलची सुविधा सुरू केल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांनी आपापले चॅनल करायला सुरुवात केली असली, तरी यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेतली आहे. पंतप्रधानांचे चॅनल सुरू होऊन अवघा आठवडाच होत असताना त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे. याबाबत पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

व्हॉटस्अ‍ॅपने चॅनल हे नवीन फीचर आणल्यानंतर राजकीय नेत्यांनी त्यावर आपापले चॅनल सुरू करण्याचा धडाका लावला आहे. सोशल मीडियावर जगात सर्वाधिक लोकप्रिय असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्लॅटफॉर्मवरही आपलीच हुकूमत असल्याचे दाखवून दिले आहे. अवघ्या सहा दिवसांत पंतप्रधानांच्या फॉलोअर्सची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे. याबाबत त्यांनी सर्वांचे आभार मानत या माध्यमातून संवाद साधत राहू, अशी ग्वाही दिली आहे.

इतर नेत्यांमध्ये राहुल गांधी यांच्या व्हॉटस्अ‍ॅप चॅनललाही प्रारंभ झाला असून, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या अद्याप तीन लाखांच्या पुढे जाऊ शकलेली नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेही व्हॉटस्अ‍ॅप चॅनल लवकरच येत आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button