Latest
Rain Update : पावसाचे आजपासून टाटा ! बाय बाय !!
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मान्सून सोमवारपासून राजस्थानातून परतीच्या प्रवासाला निघत असल्याची अधिकृत घोषणा रविवारी हवामान विभागाने केली. दरम्यान, राज्यात गुरुवारपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. दक्षिण – पश्चिम राजस्थानात पावसासाठी असणारी अनुकूल स्थिती संपली असून मान्सून तेथून सोमवारपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही गुरुवारपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 28 पर्यंत पावसाचा जोर राहणार आहे.
हेही वाचा :

