Stock Market Closing Bell | सलग चौथ्या सत्रांत विक्रीचा मारा! सेन्सेक्स २२१ अंकांनी घसरून बंद

Stock Market Closing Bell | सलग चौथ्या सत्रांत विक्रीचा मारा! सेन्सेक्स २२१ अंकांनी घसरून बंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज शुक्रवारी (दि.२२) सलग चौथ्या सत्रांत शेअर बाजारात घसरण राहिली. आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स २२१ अंकांनी घसरून ६६,००९ वर बंद झाला. तर निफ्टी ६८ अंकांच्या घसरणीसह १९,६७४ वर स्थिरावला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी स्थिर पातळीवर खुले झाले होते. त्यानंतर ते घसरणीसह बंद झाले. (Stock Market Closing Bell) जेपी मॉर्गनने (JPMorgan) भारताचा सरकारी बाँड इंडेक्स-इमर्जिंग मार्केट्स (GBI-EM) निर्देशांकात समावेश करण्याचा निर्णय घेतला. या घोषणेनंतर PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. तर फार्मा आणि मेटल घसरले. आजच्या ट्रेंडिग सत्रात जवळपास १,७४७ शेअर्स वाढले, तर १,७७९ घसरले आणि १४३ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आली नाही.

संबंधित बातम्या 

'हे' होते टॉप लूजर्स, टॉप गेनर्स

सेन्सेक्स आज ६६,२१५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६ हजारांच्या खाली आला. सेन्सेक्सवर विप्रोचा शेअर २ टक्के घसरणीसह ४१९ रुपयांवर आला. एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स हे शेअर्स १ टक्क्यांनी घसरले. आयटीसी, टायटन, भारती एअरटेल, रिलायन्स, टाटा स्टील यांनीही लाल चिन्हात बंद झाले.

निफ्टी ५० आज १९,७४४ वर खुला झाला होता. त्यानंतर तो १९,६६० पर्यंत खाली आला. निफ्टीवर डॉ. रेड्डीज, विप्रो, सिप्ला, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक हे टॉप लूजर्स होते. तर इंडसइंड बँक, मारुती, एसबीआय, एम अँड एम आणि बजाज फिनसर्व्ह हे टॉप गेनर्स राहिले.

तीन आठवड्यांतील तेजीला ब्रेक

या आठवड्यात बाजाराला सात महिन्यांतील सर्वात मोठा साप्ताहिक तोटा सहन करावा लागला आहे. गेली तीन आठवडे बाजाराने तेजी नेंदवली होती. पण या आठवड्यात या तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी ३ टक्क्यांहून अधिक खाली आले आहेत. निफ्टी बँक निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर निफ्टी मिडकॅप १०० हा या आठवड्यात सुमारे २ टक्क्यांनी खाली आला आहे. PSU बँक निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांना या आठवड्यात फटका बसला आहे.

अमेरिकेत विक्रीचा जोर, आशियाई बाजारात संमिश्र स्थिती

फेडरल रिझर्व्ह दीर्घकाळ उच्च व्याजदर कायम ठेवणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. अमेरिकेतील बाजारात काल विक्रीचा जोर दिसून आला होता. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांच्या चिंतेमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारातील घसरणीनंतर आशियात संमिश्र स्थिती दिसून आली. या पार्श्वभूमीवर युरोपमधील बाजारातही घसरणीचा ट्रेंड राहिला. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटनच्या बाजारातील निर्देशांक ०.३ ते ०.७ टक्क्यांपर्यंत घसरले. ब्लूमबर्गच्या वृत्तानंतर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक वाढला. चीनी बाजारातील शेअर्स शुक्रवारी उशिराने वाढले. हाँगकाँगमधील हँग सेंग २.३ वाढून १८,०५७ वर आला तर शांघाय कंपोझिट निर्देशांक १.६ वाढून ३,१३२ वर पोहोचला. टोकियोचा निक्केई २२५ निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरून ३२,४०२ वर आला. कारण जपानच्या मध्यवर्ती बँकेने अपेक्षेप्रमाणे त्याचा व्याजदर उणे ०.१ टक्क्यावर ठेवला आहे. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी गुंतवणूकदार या महिन्यात सक्रियपणे त्यांच्याकडील शेअर्सची विक्री करत आहेत. २० सप्टेंबरपर्यंत त्यांनी ९९६.२ दशलक्ष डॉलरच्या शेअर्सची विक्री केली आहे. स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी ३१.११ अब्ज रुपये (३७५.२ दशलक्ष डॉलर) आणि गुरुवारी ३०.०७ अब्ज रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी बुधवारी ५.७३ अब्ज रुपयांचे शेअर्स विकले. पण त्यांनी गुरुवारी त्यांनी ११.५८ अब्ज रुपयांचे शेअर्सची खरेदी केली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news