Women’s Reservation Bill:महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार | पुढारी

Women's Reservation Bill:महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार

पुढारी ऑनलाईन: संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (दि.१९ सप्टेंबर) महिला आरक्षण विधेयक मांडत, नवीन संसद भवनाचा श्रीगणेशा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारीशक्ती वंदन विधेयकाची’ घोषणा नवीन संसद सभागृहात केली. यानंतर काल (दि.२० सप्टेंबर) हे विधेयक चर्चेसाठी लोकसभा सभागृहात ठेवण्यात आले. हे विधेयक ४५४ मतांनी लोकसभेत मंजूर करण्यात आले. यानंतर केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे राज्यसभेत आज (दि.२१) महिला आरक्षण विधेयक मांडणार असून, यावर आज चर्चा देखील होणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. ( Women’s Reservation Bill)

‘महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक “नारीशक्ती वंदन अधिनियम” हे १२८ वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये संमत झाले. नव्या संसदेत लोकसभेची मंजुरी मिळविणारे हे पहिले विधेयक ठरले. एमआयएमच्या दोन खासदारांचा विरोध वगळता सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याने या ऐतिहासिक घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाजूने ४५४ तर विरोधात केवळ २ मते पडली. आता महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत मांडले जावून, चर्चेसाठी ठेवले जाणार आहे.

हेही वाचा:

Back to top button