

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनातन धर्म नष्ट करण्यासाठी 'अहंकारी' I.N.D.I.A आघाडीची स्थापना करण्यात आली आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१४) विरोधी पक्षांवर हल्लाबाेल केला. पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बीना रिफायनरी येथे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससह ५०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. यानंतर ते बाेलत हाेते.
संबंधित बातम्या :
यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले की, "विराेधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील लोकांना स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळकांना प्रेरणा देणारा 'सनातन धर्म' पुसून टाकायचा आहे. I.N.D.I.A. आघाडीला 'सनातन धर्म' नष्ट करायचा आहे. आता ते उघडपणे सनातन्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे, उद्या ते आमच्यावर हल्ले वाढवतील. देशभरातील सर्व 'सनातनी' आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या लोकांना सतर्क राहावे लागेल. अशा लोकांना रोखावे लागेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीना रिफायनरी येथील 'पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स'च्या मॉडेलची पाहणी केली. यानंतर बीना रिफायनरी येथील 'पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स' आणि राज्यभरातील दहा नवीन औद्योगिक प्रकल्पांसह 50,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. मध्य प्रदेश दाैर्यानंतर पंतप्रधान छत्तीसगडला भेट देणार आहेत.
हेही वाचा :