पुढारी ऑनलाईन : आज गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खासदारांनी नवीन संसद भवानात प्रवेश केला. जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमधील निरोप समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसह नव्या संसद भवनाकडे रवाना झाले. यासंदर्भातील माहिती आणि क्षणचित्रे संसद टीव्हीने अधिकृत X हॅंडलवरून शेअर केली आहेत. (New Parliament Building)
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी आणि इतर खासदार जुन्या संसदेच्या इमारतीतून बाहेर पडत नवीन संसद इमारतीकडे जात असताना दिसत आहे. यांच्या पाठीमागून भाजपचे अनेक राज्यसभा आणि लोकसभा खासदार देखील दिसत आहेत. या ऐतिहासिक क्षणांची छायाचित्र अनेक खासदार टिपत असताना दिसले. (New Parliament Building)
या ऐतिहासिक प्रसंगी विरोधी पक्षांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, खासदार राहुल गांधी, गौरव गोगोई आणि इतरांनी संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश केला. या प्रसंगी भारताची राज्यघटना हातात घेत, त्यांनी फोटोसेशन देखील केले. (New Parliament Building)