तिरुवनंतपूरम, वृत्तसंस्था : Nipah in Kerala : केरळमध्ये 'निपाह' विषाणूची बाधा झालेला आणखी एक रुग्ण समोर आला आहे. कोझिकोडमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीला या विषाणूची लागण झाली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 'निपाह'च्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 झाली असून, आतापर्यंत राज्यात निपाहची एकूण 6 प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
'निपाह'ने मरण पावलेल्या दोघांचे मृतदेह सध्या कोझिकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली आहे. कोझिकोडमधील एका रुग्णाचे गाव क्वॉरंटाईन झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Nipah in Kerala : उच्च जोखीम श्रेणीत 213 लोक
मृतांच्या संपर्कात आलेल्या 15 जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. संक्रमितांच्या संपर्क यादीतील 950 लोकांपैकी 213 लोक उच्च जोखमीच्या श्रेणीत आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी पुण्यातील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला भेट दिली. त्यांनी 'निपाह' व्हायरस रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी 'निपाह' उपचारासाठी आवश्यक असलेल्या मोनोक्लोनल अँटीबॉडीजची मागणी आयसीएमआरकडे नोंदविली आहे.
Nipah in Kerala : कर्नाटक सरकारचे परिपत्रक
केरळलगतच्या कर्नाटकात राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केले असून, केरळच्या बाधित भागात प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोडागू, दक्षिण कन्वनड, चामराजनगर आणि म्हैसूर जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा :