Nipah virus : केरळमध्ये आणखी एक निपाह रुग्ण | पुढारी

Nipah virus : केरळमध्ये आणखी एक निपाह रुग्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळ राज्य़ात आणखी एक निपाह विषाणूचा (Nipah alert) संसर्ग झालेला  रुग्ण आढळला आहे. ३९ वर्षीय पुरुष असल्यासे स्पष्ट आहे. सध्या हा रुग्ण  कोझिकोडमधील रुग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री कार्यालयाने दिली आहे. (Nipah virus)

दरम्यान कोझिकोड येथील एका खासगी रुग्‍णालयात तापामुळे आणखी दोन रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. तर अशीच लक्षणे असणारे तीन मुलांसह चौघांवर उपचार सुरु आहेत. मृतांपैकी एक २२ वर्षाचा तरुणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. सर्व रुग्‍णांचे नमुने पुणे येथील राष्‍ट्रीय विषाणू विज्ञान संस्था(एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले आहेत. दरम्‍यान, राज्‍यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली आहे. कोझिकोडमध्ये यापूर्वी दोनवेळा म्‍हणजे २०१८ आणि २०२१ या वर्षांपमध्‍ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.

निपाह विषाणू प्राण्‍यांसह लाेकांमध्‍येही पसरु शकताे

जागतिक आरोग्‍यसंघटनेच्‍या (WHO) मते, निपाह विषाणू हा एक झुनोटिक विषाणू आहे, म्हणजे तो प्राणी आणि लोकांमध्ये पसरू शकतो. हा हवेतून पसरणारा संसर्ग नाही. मात्र दूषित अन्नाद्वारे किंवा थेट व्यक्ती-व्यक्तीद्वारे संक्रमित होऊ शकतो. निपाह विषाणू डुकरांना आणि माणसांमध्ये आजार निर्माण करण्यासाठी देखील ओळखला जातो. या विषाणूचे नाव निपाह हे मलेशियातील गावातून घेतले गेले आहे. येथे या विषाणूमुळे पहिला रुग्‍ण बळी गेला होता.

निपाहची लक्षणे

3 ते 14 दिवस ताप, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, खोकला, घशात खवखव, मेंदूला सूज येणे ही आहेत.

‘निपाह’ हा विषाणू, संबंधित विषाणूने बाधित असलेल्या वटवाघूळ, डुक्कर आदी प्राण्यांच्या थेट संपर्कात अथवा त्यांचे रक्त, लघवी आणि लाळीमुळे बाधित होणारे अन्न, फळांच्या सेवनाने प्रसारित होतो. अशा प्राण्यांचा वा त्यांच्या संपर्कात येणार्‍या अन्न व फळांचा संपर्क टाळला, तर त्यावर मात करता येणे शक्य आहे.

हेही वाचा 

Back to top button