Sensex-Nifty hit record high | बाजारात तेजीची बरसात! सेन्सेक्सची ६७,९०० वर, निफ्टीची २०,२०० वर झेप | पुढारी

Sensex-Nifty hit record high | बाजारात तेजीची बरसात! सेन्सेक्सची ६७,९०० वर, निफ्टीची २०,२०० वर झेप

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ३९८ अंकांनी ६७,९०० वर व्यवहार केला. तर निफ्टीने २०,२०० चा टप्पा पार केला. पहिल्यांदाच निफ्टीने या विक्रमी उच्चांकावर झेप घेतली. त्यानंतर सेन्सेक्स ३१९ अंकांच्या वाढीसह ६७,८३८ वर स्थिरावला. तर निफ्टी २०,१९२ वर बंद झाला. (Sensex-Nifty hit record high)

संबंधित बातम्या 

आज बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. बाजारातील तेजीत ऑटो आणि पीएसयू बँकिंग स्टॉक्स आघाडीवर राहिले. एफएमसीजी, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि रियल्टी क्षेत्रात संमिश्र स्थिती दिसून आली. तर ऑटो, बँक, फार्मा, आयटी निर्देशांक ०.३ ते १ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले.

आज शुक्रवारी सलग ११ व्या सत्रांत सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीची (Nifty) तेजी कायम राहिली. कॉर्पोरेट कमाई आणि देशांतर्गत खरेदीमुळे सेन्सेक्सच्या वाढीला सपोर्ट मिळाला आहे. चीनमधील मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि अमेरिकेच्या फेडरल रिर्झर्व्हच्या व्याजदरवाढीची चिंता कमी झाल्याने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. (Stock Market Updates)

‘हे’ ठरले टॉप गेनर्स

सेन्सेक्स आज ६७,६५९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६७,९२७ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर टॉप गेनर ठरला. हा शेअर २.३२ टक्क्यांनी वाढून १,६०२ रुपयांवर गेला. तर भारती एअरटेल, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. ॲक्सिस बँक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, अल्ट्राटेक, सन फार्मा, इन्फोसिस या शेअर्सनीही हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स सुमारे टक्क्यांनी घसरले. यासह बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, टायटन, आयटीसी हे शेअर्सही घसरले.

Closing Bell

निफ्टी ५० आज २०,१५६ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २०,२२२ पर्यंत वाढला. निफ्टीवर बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, ग्रासीम, एम अँड एम हे शेअर्स वाढले. तर बीपीसीएल, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा कंझ्युमर, ब्रिटानिया आदी घसरले.

स्पाइसजेटचे शेअर्स वधारले

भारतीय विमानवाहतूक कंपनी स्पाइसजेटचे शेअर्स (Spicejet Share Price) आज सुमारे ४ टक्क्यांनी वाढून ४० रुपयांवर पोहोचले. या कंपनीने क्रेडिट सुईसला १५ लाख डॉलर परत देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्याचे सांगितल्यानंतर स्पाइसजेटचे शेअर्स वधारले. त्यानंतर हा शेअर ३९ रुपयांवर स्थिरावला. दरम्यान बजाज ऑटोचे शेअर्सही ५ टक्क्यांनी वाढून ५,०८४ रुपयांवर पोहोचले. (Sensex-Nifty hit record high)

जागतिक बाजार

चीनमधील ऑगस्ट महिन्यातील औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ विक्रीतील वाढ अपेक्षेपेक्षा जास्त असल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर शुक्रवारी आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. जपानचा निक्केई १.३३ टक्क्यांनी, हाँगकाँगचा हँगसेंग १.२ टक्क्यांनी आणि चीनच्या ब्लू चिप्सने ०.२ टक्क्यांनी वाढून व्यवहार केला. अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक काल वाढून बंद झाले होते. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button