Rahul Gandhi vs Narendra Modi : मोदीजींच्‍या विकासाची गाडी रिव्‍हर्स गियरमध्‍ये, तिचा ब्रेकही फेल - पुढारी

Rahul Gandhi vs Narendra Modi : मोदीजींच्‍या विकासाची गाडी रिव्‍हर्स गियरमध्‍ये, तिचा ब्रेकही फेल

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मोदीजींच्‍या विकासाची गाडी रिव्‍हर्स गियरमध्‍ये आहे आणि या गाडीचा ब्रेकही फेल झाला आहे, अशा शब्‍दात शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Rahul Gandhi vs Narendra Modi ) यांच्‍यावर हल्‍लाबोल केला.

‘४२ टक्‍के कुटुंबांवर पुन्‍हा एकदा चूल पेटविण्‍याची वेळ’

इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीच्‍या मुद्‍यांवर राहुल गांधी यांनी आपल्‍या ट्‍विटर अकाउंटवरुन एका दैनिकाची बातमी ट्‍वीट केली. यातील माहितीनुसार घरगुती गॅस सिलिंडरचे दरवाढ झाल्‍याने ४२ टक्‍के कुटुंबांवर पुन्‍हा एकदा चूल पेटविण्‍याची वेळ आली आहे, असे स्‍पष्‍ट केले आहे. या बातमीचा स्‍क्रीनशॉट शेअर करुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. ( Rahul Gandhi vs Narendra Modi ) मोदीजी यांची विकासाची गाडी रिव्‍हर्स गियरमध्‍ये असून, या गाडीचा ब्रेकही फेल झाला आहे, असे त्‍यांनी म्‍हटलं आहे.

यापूर्वीही राहुल गांधी यांनी इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीविरोधात केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. पेट्रोलवरील कर वाढवून केंद्र सरकार जनतेला लूटत आहे. ज्‍या राज्‍यांत निवडणुका होणार आहेत तेथेच इंधनदर कमी होणार आहेत, असाही टोला त्‍यांनी लगावला होता. नरेंद्र मोदी यांच्‍या सरकारने जनतेला कष्‍ट देण्‍याचे रेकॉर्ड केले आहे, अशी टीका काँग्रेसचे महासचिव प्रियांका गांधी यांनी केली होती.

हेही वाचलं का?

 

Back to top button