money laundering case : अनिल देशमुखांच्या कोठडीत १४ दिवसांनी वाढ | पुढारी

money laundering case : अनिल देशमुखांच्या कोठडीत १४ दिवसांनी वाढ

मुंबई; पुढारी ऑनलाईन

वसूली प्रकरणात (money laundering case) अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना १ नोव्हेंबर रोजी चौकशीनंतर अट करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी देशमुख (money laundering case) सोमवारी स्वतःच ईडीसमोर हजर झाले. तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर रात्री सव्वा एकच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. अप्पर सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर हजर करत ईडीतर्फे अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी देशमुख यांची 14 दिवसांची कोठडी मागितली होती.

न्यायालयाने देशमुख यांना दिलासा देत घरचे जेवण, औषधे आणि वकिलांना भेटण्याची मुभा दिली आहे. देशमुख यांच्यावतीने अ‍ॅड. अनिकेत उज्वल निकम आणि विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली.

money laundering case : अनिल देशमुख यांच्या २७ कंपन्यांचा तपास

मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 13 कंपन्या आणि नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींच्या नावावर 14 कंपन्या आहेत. तसेच कागदोपत्री आणखी काही कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने ही माहिती न्यायालयात दिली असून त्याआधारे याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास करत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीसुद्धा गुन्हा दाखल करुन तपास करत आहे. ईडीने 13 तासांच्या चौकशीअंती सोमवारी रात्री एकच्या सुमारास देशमुखांना अटक केली. त्यानंतर ईडीने मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असताना अनेक खुलासे केले आहेत.

ईडीच्या रडारवर असलेल्या कंपन्या

मेसर्स राबिया लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स ब्लॅक स्टोन लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स काँक्रीट एंटरप्राइज प्रा. लि., मेसर्स नॉटिकल वेअरहाउसिंग प्रा. लि., मेसर्स पॅराबोला वेअरहाऊसिंग प्रा. लि., मेसर्स बायो-नॅचरल ऑरगॅनिक प्रा. लि., मेसर्स काटोल एनर्जी प्रा. लि., मेसर्स सब्लाइम वेअरहाउसिंग प्रा, लि., मेसर्स विश्वेश लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स अरोमा एंटरप्राइजेस प्रा. लि., मेसर्स मिन्ट्री प्रीमियर लाइफस्टाइल अँड ब्युटी प्रा. लि., मेसर्स मृगतृष्णा ट्रेडिंग प्रा. लि. आणि ट्रॅव्होटेल्स हॉटेल.

हे ही वाचलं का?

Back to top button