Bengaluru Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; स्वतःच्याच बसखाली चिरडून ७ महिला ठार

Bengaluru Accident
Bengaluru Accident

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : देवदर्शनासाठी धर्मस्थळला गेलेल्या सात महिलांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. ज्या मिनी बसमधून या महिला देवदर्शनाला गेल्या होत्या. त्याच मिनी बस खाली चिरडून यातील सात महिला ठार झाल्या. ही अपघात दुर्घटना बंगळूर-चेन्नई महामार्गावर सोमवारी (दि.११ सप्टेंबर) पहाटे  झाली.

तमिळनाडूतील महिलांचा एक गट धर्मस्थळ, उडपी आणि मैसूरच्या सहलीवर दोन मिनी बसमधून गेला होता. धर्मस्थळला कुक्के सुब्रमण्यमचे दर्शन घेतल्यानंतर या महिला तमिळनाडूला परत निघाल्या होत्या. मात्र वाटेत सोमवारी पहाटे एक मिनी बस नादुरुस्त झाली. ही बस रस्त्याकडेला थांबवून ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न चालक करत होता. दरम्यान आज सकाळी पहाटे बस बंद पडल्याने बसमधील महिला बसच्या समोरच्या बाजूला रस्त्यावर बसल्या होत्या.

आज पहाटे रस्त्यावर दृश्यमानता कमी होती. दरम्यान पाठीमागून आलेल्या ट्रकने देवदर्शनासाठी आलेल्या मिनी बसला मागून धडक दिली. त्या धडकेने मिनी बस पुढे गेल्याने बस खाली सापडून सात महिला चिरडल्या गेल्या आणि जागीच ठार झाल्या, तर १० महिला जखमी झाल्या आहेत. सर्व महिला तामिळनाडूच्या ओननगुटी या गावातील आहेत. दोन दिवसांपूर्वी त्या कर्नाटकात आल्या होत्या. अपघात बंगळूर-चेन्नई महामार्गावर थीरुपतूर जिल्ह्यात झाला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news