IndiGo Flight | मुंबई-गुवाहाटी विमानात पुन्हा महिला प्रवाशाचा विनयभंग; गुन्हा दाखल

IndiGo flight
IndiGo flight
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : गेल्या काही महिन्यांपासून विमानांमध्ये छेडछाडीची प्रकरणे थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) विमानात एका महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने कथित लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर गुवाहाटी येथे विमान उतरल्यानंतर आरोपीला आसाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. इंडिगोच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत सांगितले की, तक्रारदाराने स्थानिक पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे, त्या आधारावर आरोपीविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. (IndiGo Flight)

IndiGo Flight : आसाम पोलिसांनी आरोपीला पकडले

इंडिगोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.10 सप्टेंबर) फ्लाइट क्रमांक 6E 5319 महिला विनयभंगाची घटना घडली. पीडितेने गुवाहाटी येथे विमान उतरल्यानंतर कथित लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. यानंतर आरोपीला आसाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

काय आहे घटना?

पीडित महिला प्रवाशाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, ती फ्लाइटमध्ये आराम करत होती. या दरम्यान मी माझे डोळे बंद केले होते, काही वेळाने तिच्या लक्षात आले की सीटवरील आर्मरेस्ट सीट उंचावली होती. ज्यावर ती स्त्री प्रथम काही बोलली नाही. मात्र, महिला प्रवाशाला नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. यानंतर पुन्हा पीडितेने डोळे बंद करत, झोपल्याचे नाटक केले. तेव्हा तिच्या लक्षात आले की, शेजारी बसलेल्या पुरूष व्यक्तीने आर्मरेस्ट वर केला होता आणि तो चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. एवढेच नाही तर ती व्यक्ती जवळही आली होती, असेही संबंधित महिलेने तक्रार नोंदवताना पोलिसांना सांगितले.

इंडिगोकडून कंपनीकडून स्पष्टीकरण

या घटनेवर इंडिगो विमान कंपनीचे प्रवक्ते म्हणाले की, या प्रकरणातील तपासात आम्ही आवश्यक तेथे मदत करू. तक्रार मिळताच आम्ही तातडीने कारवाई केल्याचेही कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितले आहे.

यापूर्वी महिला क्रू मेंबरचाही विनयभंग

यापूर्वी दुबईहून अमृतसरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये विनयभंगाची घटनाही समोर आली होती. श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असलेल्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने फ्लाइटमधील महिला क्रू मेंबरचा विनयभंग केला. मात्र, विमान अमृतसरला पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली होती.

दोन महिन्यांत विमान प्रवासात छेडछाडीची ४ प्रकरणे

गेल्या दोन महिन्यांत विविध विमानप्रवासात लैंगिक छळाच्या किमान चार घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी दिल्ली-मुंबई स्पाईसजेट फ्लाइटमध्ये कथित लैंगिक छळ प्रकरण समोर आले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही या घटनेवर दिल्ली पोलीस आणि डीजीसीएला नोटीस बजावली होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news