IndiGo : इंडिगोच्या ‘एमडी’ला विशेषाधिकार समितीसमोर हजर राहण्याचे आदेश

IndiGo : इंडिगोच्या ‘एमडी’ला विशेषाधिकार समितीसमोर हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने विमानसेवा पुरवणारी कंपनी 'इंडिगो'चे व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांना ३० ऑगस्टला समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळावर खासदारांना योग्य शिष्टाचार दिला जात नाही तसेच सुविधा पुरविल्या जात नसल्यासंबंधी खासदारांकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर प्रोटोकॉल उल्लंघनाच्या तक्रारीच्या आधारे भाटिया यांना समितीने हजर राहण्यास सांगितले आहे. (IndiGo)

खासदारांना देण्यात येणाऱ्या शिष्टाचाराचे पालन केले जात नाही तसेच सुविधा उपलब्ध करवून दिली जात नाही, अशा तक्रारी अनेक खासदारांकडून करण्यात आल्या होत्या. यासंबंधी कंपनीची बाजू ठेवण्यासाठी भाटियांना बोलवण्यात आले आहे. कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना देखील विशेषाधिकार समितीने हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.१८ ऑगस्टला चौधरी यांच्यासंबंधी विशेषाधिकार समितीची बैठक घेण्यात आली होती.

बैठकीत चौधरी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चौधरी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या प्रतिष्ठे विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच समितीने भाजप खासदार जनार्दन सिंह  सिग्रीवाल यांना देखील त्यांच्या तक्रारीवर आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश समितीने दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news