Aditya-L1 Mission: ‘आदित्य L-1’ ने तिसर्‍यांदा यशस्वीरित्या बदलली कक्षा; लक्ष्यापासून काहीच पावले दूर | पुढारी

Aditya-L1 Mission: 'आदित्य L-1' ने तिसर्‍यांदा यशस्वीरित्या बदलली कक्षा; लक्ष्यापासून काहीच पावले दूर

पुढारी ऑनलाईन डेस्क: सूर्ययान ‘आदित्य एल-१’ बाबत (Aditya-L1 Mission) इस्रोने (ISRO) महत्त्वाची अपडेट दिली आहे. देशाची पहिली सौर मोहिम आदित्य एल-१ ने पृथ्वीची तिसरी कक्षा यशस्वीरित्या बदलली आहे. ‘आदित्य एल-१’ आता २९६ किमी x ७१७६७ किमी कक्षेत फिरत आहे. पुढील कक्षा बदलण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजता होणार असल्याची माहिती इस्रोने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत दिली आहे. (Aditya-L1 Mission)

यापूर्वी Aditya L1 ने पृथ्वीची पहिली कक्षा ३ सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पार पडली होती. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी ‘आदित्य एल-१’ ने दुसरी कक्षा पार केली होती. आता या सूर्ययानाने आज तिसरी कक्षा यशस्वीरित्या बदलून चौथ्या कक्षेतील मार्गक्रमणाला सुरूवात केली आहे. हे यान १५ सप्टेंबर रोजी चौथी कक्षा पूर्ण करत पाचव्या कक्षेत प्रवेश करणा आहे, असे इस्रोने म्हटले आहे.  (Aditya-L1 Mission)

Aditya-L1 Mission: अनेक रहस्ये उलगडणार

सूर्य मोहिमेच्या माध्यमातून ‘इस्रो’ सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करणे ‘इस्रो’ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास ‘आदित्य एल-1’ करणार आहे. त्याखेरीज सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील, अशी अपेक्षा आहे. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल माहिती मिळेल. ‘आदित्य एल-1’चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्‍या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. ‘चांद्रयान-3’प्रमाणेच ‘आदित्य एल-1’ सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्‍या मारेल. त्यानंतर १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून ‘एल-1’ पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्‍या मारताना ‘आदित्य एल-1’ सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल. (Aditya L1 Launch)

हेही वाचा:

Back to top button