पुढारी ऑनलाईन : आजपासून (दि.९ सप्टेंबर) दोन दिवस देशाची राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद संपन्न होत आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुख भारत मंडपम येथे होणाऱ्या परिषदेला हजेरी लावत आहेत. पीएम मोदी हे राष्ट्रप्रमुखांच्या स्वागतासाठी उपस्थित असून, आत्तापर्यंत अनेक राष्ट्राच्या नेत्यांनी मडपममध्ये हजेरी लावली आहे. या नेत्यांच्या स्वागतासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत मंडपम येथे उपस्थित आहेत. (G20 Summit 2023)
पंतप्रधान मोदी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करत आहेत. आत्तापर्यंत, पीएम मोदींनी IMF चे प्रमुख, जागतिक बँकेचे प्रमुख, इजिप्तचे पंतप्रधान, मॉरिशसचे पंतप्रधान, स्पेनचे पंतप्रधान, नेदरलँडचे पंतप्रधान इत्यादींसह अनेक प्रमुख नेत्यांचे स्वागत केले आहे. या परिषदेला २८ देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (G20 Summit 2023)
आत्तापर्यंत दिल्लीच्या प्रगती मैदानावर G 20 शिखर परिषदेच्या स्थळ भारत मंडपम येथे अनेक देशाचे राष्ट्रपती पोहोचले आहेत. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ, युरोपियन कौन्सिलचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स मिशेल, युरोपियन कमिशनचे राष्ट्राध्यक्ष, उर्सुला वॉन डॉर लेयन, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सहभागी झाले आहेत.
तसेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग आणि स्पेनच्या उपराष्ट्रपती नादिया कॅल्व्हिनो, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट्टे आणि नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद टिनुबू आदिंनी G20 शिखर परिषदेसाठी भारत मंडपम येथे हजेरी लावली आहे.
G20 परिषदेसाठी पंतप्रधान मोदी भारत मंडपम येथे पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि NSA अजित डोवाल हे देखील उपस्थित आहेत. G20 चे पहिले सत्र आज सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. या सत्रामध्ये हवामान बदलाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाऊ शकते. दुपारी दीड वाजेपर्यंत हे सत्र सुरू राहणार असून, त्यानंतर दुपारचे जेवणाचा कार्यक्रम होईल.