G20 Summit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्‍लीत दाखल | पुढारी

G20 Summit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्‍लीत दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजधानी दिल्‍ल्‍ली आगामी G-20 शिखर परिषदेसाठी सज्ज झाली आहे. ९ ते १० सप्टेंबर रोजी दिल्लीत ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात येत आहेत. आज (दि.८)  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे दिल्‍लीत दाखल झाले. दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  आज जो बायडेन यांच्‍यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.

दिल्‍ली विमानतळावर उड्डयन राज्‍यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग आणि अमेरिकेच्‍या भारतातील राजदूत एरिक गार्सेटी त्यांची मुलगी माया हिने बायडेन यांचे स्वागत केले. बायडेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट देतील. आज दोन्ही नेत्यांमध्‍ये स्वच्छ ऊर्जा, व्यापार, उच्च तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा यावर चर्चा होण्‍याची शक्‍यता आहे.

नवी दिल्‍लीत G-20 शिखर परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. पाहुण्यांच्या सुरक्षेपासून ते त्यांच्या मुक्कामापर्यंतची सर्व व्यवस्था आता अंतिम टप्प्यात आहे. दिल्लीच्या स्वच्छता आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी शहरात फिरून सर्व तयारी व स्वच्छतेचा आढावा घेतला. परिषदेदरम्यान विदेशी पाहुणे राहणार हॉटेल्‍सच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेत वाढ करण्‍यात आली आहे. भारत मंडपम या नावाने ओळखल्या जाणार्‍या नवीन आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-कम-कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शिखर परिषद पार पडणार आहे. दरम्‍यान,संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान G-20 शीख परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. दिल्ली विमानतळावर गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button