Tripura Bypolls : पोटनिवडणुका – त्रिपुरातील दोन्ही जागा भाजपने जिंकल्या; ‘इंडिया’ आघाडीला फटका | Tripura Bypolls

Rajya Sabha election 2024
Rajya Sabha election 2024

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील ६ राज्यांतील विधानसभेच्या ७ जागांसाठी शुक्रवारी मतमोजणी सुरू आहे. यातील त्रिपुरातील दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. धानपूर आणि बॉक्सानगर या दोन विधानसभेच्या जागा जिंकत भाजपने चांगली सुरुवात केली आहे. या दोन्ही जागांवर भाजपविरुद्ध काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी अशी थेट लढत होती.

बॉक्सानगर येथून भाजपचे तफजाल होस्सैन विजयी झाले, त्यांनी विरोधी मिझान हौस्सेन यांचा पराभव केला.
तर धानपूरमधून भाजपचे बिंदू देबनाथ विजयी झाले, त्यांनी कौशिक चंद यांचा पराभव केला.

बॉक्सनगरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार समसुल हक यांचे निधन झाल्यानंतर रिक्त जागेवर ही निवडणूक झाली. तर धानपूरमधून केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली होती.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news