G20 summit : G20 परिषदेदरम्यान PM मोदी घेणार ‘मॅरेथॉन’ बैठका | पुढारी

G20 summit : G20 परिषदेदरम्यान PM मोदी घेणार 'मॅरेथॉन' बैठका

पुढारी ऑनलाईन डेस्क : G20 summit : देशाच्या राजधानी दिल्लीत G20 परिषद उद्या 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दिल्लीत होणाऱ्या 9 आणि 10 सप्टेंबरच्या दोन दिवसीय परिषदेसाठी G20 चे सदस्य असलेल्या देशांचे प्रमुख दिल्लीत यायला सुरूवात झाली आहे. G20 चे सदस्य असलेल्या 28 देशांपैकी 26 देशांचे राष्ट्रपती आणि इतर दोन देशांचे प्रतिनिधी या परिषदेला हजेरी लावणार आहेत. या परिषदेदरम्यान पीएम मोदी अनेक देशांसोबत 15 हून अधिक द्विपक्षीय बैठका घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने ट्विटरवरून (G20 summit) दिली आहे.

G20 summit : या देशांसोबत द्विपक्षीय बैठका

एएनआयने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांच्या कालावधीत जागतिक नेत्यांसोबत 15 पेक्षा अधिक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. पंतप्रधान मोदी आज, शुक्रवारी (दि. 8) मॉरिशस, बांगलादेश आणि अमेरिकेच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. उद्या शनिवारी (दि. 9) G20 बैठकींव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी यूके, जपान, जर्मनी आणि इटली यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका (G20 summit) घेतील.

तसेच रविवारी (दि.10) पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत भोजनादरम्यान द्विपक्षीय कामकाजासंदर्भात बैठक घेतील. द्विपक्षीय मुद्द्यावर कॅनडासोबतही पीएम मोदी स्वतंत्र बैठक घेतील. कोमोरोस, तुर्की, यूएई, दक्षिण कोरिया, ईयू/ईसी, ब्राझील आणि नायजेरियासोबतही पीएम मोदी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे एएनआयने म्हटले (G20 summit) आहे.

हेही वाचा:

Back to top button