

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Bharat Mandapam : राजधानी दिल्लीत 9 व 10 सप्टेंबरला जी-20 शिखर परिषद होत असून, भारत मंडपममध्ये होणार्या मुख्य कार्यक्रमाला जगातील 26 देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान हॉलच्या प्रत्येक सीटवर असलेली ऑडिओ व्हिज्युअल सिस्टिम 16 भाषा समजू शकते.
संपूर्ण इमारत फाईव्ह-जी क्षमतेच्या वायफायने सुसज्ज. याच परिसरात 28 फूट उंच कांस्याची नटराज मूर्ती.
चौथ्या मजल्यावर 3 हजार क्षमतेचे अॅम्फी थिएटर.
25 मीटर उंचीवर व्ह्यूईंग गॅलरी.
नामकरण 'दिल्लीची खिडकी' येथून दिल्लीचे द़ृश्य म्हणजे हिरवळीमध्ये असलेले इंडिया गेटचे शिखर व लाल किल्ल्याची तटबंदी दिसते.
चार मजली इमारतीत 24 बैठक खोल्या.
20 खोल्या तळमजल्यावर. एकूण क्षमता 14 हजार.
5,500 वाहनांची पार्किंग व्यवस्था. उंची 35 मीटर. म्हणजे कुतुबमिनारच्या अर्धी. सजावटीवर खर्च 27 कोटी रुपये.
योग भिंतीवर 32 योगासने दाखविली आहेत.
संदेश सांस्कृतिक दालनात 29 देशांच्या 29 भाषांमध्ये वसुधैव कुटुंबकम 'विश्व एक कुटुंब आहे,' असे लिहिले आहे.
परिषद हॉलची शैली अनन्यसाधारण आहे. शाही लूक देण्यासाठी शंखांसारखे झुंबर लावले आहेत.
स्वावलंबी
डिझाईन बनवण्यापासून ते निर्मितीसाठी वापरलेले प्रत्येक साहित्य पूर्णपणे स्वदेशी आहे.
हे ही वाचा :