Closing Bell | शेअर बाजारात तेजीचा चौकार! सेन्सेक्स ६५,८८० वर बंद, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग

Closing Bell | शेअर बाजारात तेजीचा चौकार! सेन्सेक्स ६५,८८० वर बंद, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सलग चौथ्या सत्रांत आज बुधवारी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स १०० अंकांनी वाढून ६५,८८० वर बंद झाला. तर निफ्टी ३६ अंकांच्या वाढीसह १९,६११ वर स्थिरावला. आजच्या दिवसाच्या निचांकावरून सेन्सेक्स ३९० अंकांनी सावरला. क्षेत्रीय पातळीवर एफएमसीजी निर्देशांक १ टक्क्याने वाढला. तर फार्मा, ऑईल आणि गॅस, पॉवर निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे मेटल, रियल्टी आणि बँक निर्देशांक ०.४ ते १ टक्क्याने घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले.

कमकुवत जागतिक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा परिणाम आज काही प्रमाणात भारतीय बाजारात दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीने काळी वेळ सपाट पातळीवर व्यवहार केला.

सेन्सेक्स आज ६५,७४४ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,९३९ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, टायटन, आयटीसी, सन फार्मा हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी वाढले. तर टाटा स्टील, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.

साखर कंपन्यांचे शेअर्स वधारले

साखरेच्या किमती सहा वर्षांच्या उच्चांकावर गेल्याने बुधवारी दिवसभरात साखर कंपन्यांचे शेअर्स बीएसईवर १० टक्क्यांपर्यंत वाढले. साखरेचे दर सप्टेंबर २०१७ नंतरच्या उच्च पातळीवर पोहोचले आहेत. कमी पावसाच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर साखर महागली आहे. या पार्श्वभूमीवर आज राणा शुगर्स, श्री रेणुका शुगर्स, द उगर शुगर, द्वारिकेश शुगर, त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज आणि बलरामपूर चिनी मिल्स यांचे शेअर्स वाढले.

जिओ फायनान्शिअल घसरला

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा (Jio Financial shares) शेअर निफ्टी ५० आणि एनएसईच्या इतर निर्देशांकातून बाहेर पडण्यापूर्वी बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात एनएसईवर सुमारे ३ टक्के घसरून २४७ रुपयांच्या निचांकी पातळीवर गेला. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांत जिओ फायनान्शियलने प्राइस बँडवर जाता न आल्याने शेअर वगळण्याचा निर्णय घेतला. सेन्सेक्स आणि इतर बीएसई निर्देशांकांमधून हा शेअर वगळल्यानंतर जवळपास एक आठवड्यानंतर NSE निर्देशांकातून तो वगळण्याची बातमी समोर आली. हा शेअर निफ्टीवरुन ७ सप्टेंबर रोजी डीलिस्ट केला जाणार आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स मंगळवारी लाल चिन्हात बंद झाले होते. गेल्या सोमवारी या शेअर्सने २६१.८ रुपयांच्या स्थिर किमतीला मागे टाकून २६७ रुपयांचा सर्वकालिन उच्चांक गाठला होता. सोमवारी हा शेअर ९ टक्क्यांपर्यंत वाढला होता. जिओ फायनान्शिअल २१ ऑगस्ट रोजी बाजारात लिस्ट झाला होता. सुरुवातीच्या काही दिवसांत या शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला.

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

आशियाई बाजारांत संमिश्र वातावरण राहिले. सेऊल, शांघाय आणि हाँगकाँग येथील शेअर बाजारत घसरण दिसून आली. तर टोकियोतील बाजारात तेजी राहिली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.६२ टक्के वाढून ३३,२४१ वर बंद झाला. या निर्देशाकाने गाठलेली ही एका महिन्यातील उच्च पातळी आहे. काल मंगळवारी अमेरिकेतील शेअर बाजारातील निर्देशांक घसरून बंद झाले होते.

परदेशी गुंतवणूदारांकडून विक्रीचा मारा सुरुच

भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा सुरुच आहे. एनएसईवरील आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) मंगळवारी (दि.५) १,७२५.११ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) १,०७७.८६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत या महिन्यात, FII ने निव्वळ ४,६०४.८४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत तर DII ने ५,९३६.२७ कोटी रुपयांचे शेअर्सची खरेदी केली. ऑगस्ट महिन्यात, FII ने २०,६२०.६५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली होती.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news