Chandrayaan-3 mission Menu : मसाला डाेसा आणि…. : जाणून घ्‍या ‘चांद्रयान-३’वेळी ‘इस्रो’ शास्त्रज्ञांचा रोजचा ‘मेन्‍यू’ | पुढारी

Chandrayaan-3 mission Menu : मसाला डाेसा आणि.... : जाणून घ्‍या 'चांद्रयान-३'वेळी 'इस्रो' शास्त्रज्ञांचा रोजचा 'मेन्‍यू'

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताने चांद्रमोहिम यशस्वी करत जगभराच्या अवकाश संशोधनात इतिहास रचला आहे. ही मोहिम फत्ते करण्यासाठी अनेक भारतीय शास्रज्ञांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. चांद्रयान-३ प्रकल्पात काम करणाऱ्या टीमची प्रेरणा कायम राहावी म्हणून ISRO कडून खास बेत करण्यात येत होता. इस्रोकडून दररोज चांद्रयान-३ मोहीमेतील शास्त्रज्ञांना मसाला डोसा आणि कॉफी दिली जात होती. जाणून घेऊया याविषयी सविस्तर…(Chandrayaan-3 mission Menu)

चांद्रयान मोहिमेला २०१९ पासून सुरूवात झाली. ही मोहिम फत्ते करण्यासाठी सलग तीन वर्षे इस्रोच्या अनेक शास्त्रज्ञांचे हात यामध्ये लागले होते. अनेक शास्त्रज्ञांनी कामाव्यतिरिक्त आपले अधिकचे तास देखील या मोहिमेसाठी दिले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) शास्त्रज्ञांची प्रेरणा वाढवण्यासाठी खास प्रयत्न करण्यात आले. यामध्ये शास्त्रज्ञांसाठी खास मेन्यूचा येत होता. या मोहीमेत अधिकवेळ काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना दरररोज ५ वाजता इस्रोकडून मोफत मसाला डोसा कॉफीआणि फिल्टर कॉफी दिली जात होती, अशी माहिती चांद्रयान-३ मोहीमेतील शास्त्रज्ञ व्यंकटेश्वर शर्मा (Chandrayaan-3 mission Menu) यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिम काळात प्रत्येक शास्त्रज्ञांने स्वेच्छेने अतिरिक्त तासांची गुंतवणूक केली. त्यामुळे त्याची प्रेरणा वाढवण्यासाठी इस्रोने दररोज सायंकाळी ५ वाजता खास बेत केला होता. इस्रोच्या या बेतामुळे त्यामुळे चांद्रयान-३ मोहीमेतील शास्त्रज्ञांनी आनंदाने ज्यादा तास या मोहीमेसाठी दिल्याचेही शास्त्रज्ञ व्यंकटेश्वर शर्मा यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत (Chandrayaan-3 mission Menu) म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hindustan Times (@hindustantimes)

Chandrayaan-3 mission Menu: चांद्रयान-३ किफायतशीर अंतराळ मोहिमांपैकी एक

शास्त्रज्ञांना आर्थिक बक्षीस देणे शक्य नसल्याने इस्रोकडून शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी ही कल्पना अंमलात आणल्याचेही इस्रोचे शास्त्रज्ञ व्यंकटेश्वर शर्मा यांनी म्हटले आहे. चांद्रयान -३ ही आतापर्यंतच्या सर्वात किफायतशीर अंतराळ मोहिमांपैकी एक आहे. चांद्रयान-३ मोहिमेचे बजेट हे केवळ ६१५ कोटी होते, हे उल्लेखनीय आहे. कारण चांद्रयान 2 आणि त्यापूर्वीच्या अनेक मोहीमांसाठी सुमारे ९७८ कोटीपर्यंत इस्रोकडून खर्च झाला होता, असे ‘टाईम्स ऑफ इंडिया‘ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button