Cheetah in Kuno : ‘चित्त्यांचा मृत्यू ही सामान्य बाब’; भारतातील नामिबियाचे उच्चायुक्त सिनिम्बो यांचे मत

Chittah in Kuno National Park
Chittah in Kuno National Park

पुढारी ऑनलाइन डेस्क : Cheetah in Kuno : भारतात गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चित्रा पुनर्स्थापन प्रकल्पाअंतर्गत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण 20 चित्ते मागवण्यात आले होते. दरम्यान यावर्षी मार्च महिन्यापासून आतापर्यंत 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारतातील वातावरण चित्त्यांसाठी योग्य नाही, अशी चर्चा सुरू आहे. चित्त्यांच्या मृत्यूवर आता भारतातील नामिबियातील उच्चायुक्त गॅब्रिएल सिनिम्बो (Gabriel Sinimbo) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे.

Cheetah in Kuno : चित्त्यांचा मृत्यू सामान्य – गॅब्रिएल सिनिम्बो

भारतातील नामिबियाचे उच्चायुक्त ग्रॅब्रिएल सिम्बो यांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्या देशातून आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशात आणलेल्या अनेक चित्त्यांचा मृत्यू होणे ही सामान्य बाब आहे. प्राण्यांना नवीन वातावणाची ओळख करून देत आहोत. त्यामुळे या प्रकल्पात अनेक आव्हाने आहेत.

सिंम्बो पुढे म्हणाले, जेव्हा तुम्ही प्राण्यांना नवीन वातावणरणाशी ओळख करून देता तेव्हा त्यात आव्हाने असू शकतात. मृत्यू हे देखील एक आव्हानच आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकल्पाचा हा एक भाग आहे. असे म्हणत सिम्बो यांनी भारताच्या वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेण्यास सक्षम होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. Cheetah in Kuno

प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतातून 70 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या प्राण्याचे भारतात पुनर्स्थापन करण्यात आले. त्यासाठी गेल्या वर्षी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण 20 रेडिओ कॉलर प्राणी आणण्यात आले. त्यांना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Cheetah in Kuno) सोडण्यात आले. नंतर नामिबियातील चित्ता ज्वाला हीने चार पिल्लांना जन्म दिला. त्यामुळे एकूण 24 चित्ते झाले. त्यापैकी तीन शावकांसह 9 चित्त्यांचा या वर्षात मृत्यू झाला आहे.

Cheetah in Kuno : नामिबिया या उपक्रमामुळे खूश – सिनिम्बो

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्त्यांचा पुन्हा परिचय करून देण्याचा हा एक अभिनव प्रकल्प आखला आहे आणि आमचे एकमेकांना आधार देण्याचे नाते पाहता नामिबिया या उपक्रमामुळे खूप खूश आहे, असे सिनिम्बो म्हणाले.

इंडिया टुडेच्या माहितीनुसार, कुनोमध्ये 14 चित्ते असून त्यात सात नर आणि सहा मादी आणि एक मादी शावक आहे. कुनो वन्यजीव पशुवैद्य आणि नामिबियातील तज्ञ यांचा समावेश असलेली टीम त्यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवत आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news