Female Cheetah Nirva : ‘कुनो पार्क’मधील बेपत्ता मादी चित्ता अखेर 22 दिवसांनी सापडली! | पुढारी

Female Cheetah Nirva : 'कुनो पार्क'मधील बेपत्ता मादी चित्ता अखेर 22 दिवसांनी सापडली!

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथे गेल्या 22 दिवसांपासून बेपत्ता असलेली मादी चित्ता अखेर सापडली आहे. पार्क प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. या मादी चीत्त्याचे नाव निर्वा (female cheetah nirva) असे असून तिचा शोध घेण्यासाठी 100 जणांची पाच 5 पथके मेहनत घेत होती. अखेर 22 दिवसांनी तिचा शोध संपल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

रेडिओ कॉलर खराब झाल्याने 21 जुलै पासून बेपत्ता

गेल्या काही दिवसांपासून कुनो येथे चित्त्यांच्या सातत्याने मृत्यू होत असल्याने कुनो नॅशनल पार्क प्रशासन चांगलेच अडचणीतून जात आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतील मादी चित्ता निर्वा (female cheetah nirva) हिचा रेडिओ कॉलर खराब झाल्यानंतर ती 21 जुलै पासून बेपत्ता झाली होती. निर्वाचे लोकेशन ट्रेस होत नसल्याचे ज्यावेळी समोर आले त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि शोध मोहिम युद्ध पातळीवर राबवण्यात आली. ड्रोनचीद्वारे ही तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. पण काही केल्या निर्वा सापडत नव्हती. अखेर ती रविवारी (13 ऑगस्ट) कुनो नॅशनल पार्कच्या धोरेट रेंजमध्ये सकाळी 10 वाजता सापडली. त्यानंतर तिला पकडून आरोग्य तपासणी घेण्यात आली.

शनिवारी लोकेशन सापडले

शनिवारी (12 ऑगस्ट) सायंकाळी नीर्वाचे (female cheetah nirva) लोकेशन सॅटेलाइटद्वारे मिळाले. तात्काळ शोध पथके प्राप्त झालेल्या ठिकाणी पाठवण्यात आली. दिवसभरात तिची अन्य इतर लोकेशन्सही मिळाली. अखेर श्वानपथक, ड्रोन पथक आणि पशुवैद्यकीय पथकाने सायंकाळी नीर्वाला शोधून काढले. पण, यावेळी या मादी चित्त्याला पकडता आले नाही. रविवारी तिला पकडण्याचा बेत आखण्यात आला.

सहा तासांहून अधिक काळ चालले बचावकार्य

शनिवारी रात्रभर नीर्वाच्या लोकेशन्सवर नजर ठेवण्याची जबाबदारी ड्रोन पथकांनी यशस्वीरित्या पार पार पाडली. ड्रोन पथकांनी दिलेल्या ठिकाणाच्या माहितीच्या आधारे रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली. सुमारे 6 तास चाललेल्या ऑपरेशननंतर नीर्वाला ताब्यात घेण्यात आले. ती पूर्णपणे निरोगी असून तिची आरोग्य तपासणी करण्यात आली, असे वन अधिका-यंनी सांगितले.

3 शावकांसह 6 चित्यांचा मृत्यू

पार्कमध्ये आतापर्यंत 6 प्रौढ चित्त्यांसह 3 शावकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 14 चित्त्यांसह (7 नर, 7 मादी) आणि एका मादी शावकाला उद्यानाच्या आवारात मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्व चित्तांवर प्रत्येक क्षणी बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, अशीही माहिती वन अधिका-यांनी दिली.

Back to top button