Chittah : कुनो उद्यान सोडून चित्ता जवळच्या खेड्यात घुसला; पुन्हा जंगलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू (पाहा व्हिडिओ)

chittah
chittah

पुढारी ऑनलाइन डेस्क : कुनो राष्ट्रीय उद्यानातून एक चित्ता Chittah जंगल सोडून जंगलाजवळ असलेल्या खेड्यात घुसला आहे. चित्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खेड्यातील एका स्थानिकांनी याचा व्हिडिओ बनवून तो शेअर केला आहे. दरम्यान, वनविभाग या चित्त्याला पुन्हा जंगलात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्ता Chittah पुनर्स्थापन या प्रकल्पाअंतर्गत भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा भारतात पुनरुज्जीवित करण्यासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका येथून 20 चित्ते आणले गेले. सुरुवातीला नामिबियातून 17 सप्टंबर रोजीन 8 चित्ते आणण्यात आले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते Chittah आणण्यात आले. त्यांना देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते.

मध्यंतरीच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांना Chittah भारतातील वातावरण मानवणार नाही. ते त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. यावरून काही लोकांनी आक्षेप घेतले होते. चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थिरावून 6 महिन्यांचा काळ लोटला आहे. यामध्ये एका चित्त्याचा किडनी खराब झाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर आफ्रिकेतील चित्त्यांना भारताचे वातावण मानवणार नाही. किंवा त्यांना भारतात पुनरुज्जीवित करणे योग्य घातक ठरेल अशा चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर काही काळातच एका मादी चित्त्याने Chittah पिल्लांना जन्म दिला. ही मादी आणि तिची पिल्ले सर्व स्वस्थ आहेत. त्यामुळे नकारात्मक चर्चांना ब्रेक लागला आहे.

दरम्यान, कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांच्या Chittah हालचालींवर वनविभागाकडून सातत्याने बारकाईने लक्ष ठेवले जाते. या चित्त्यांपैकीच एक चित्ता कुनोचे जंगल ओलांडून जंगलालागून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या विजापूरच्या झार बरोदा खेड्यात घुसला. येथील काही स्थानिकांनी त्याचे शुटिंग करून तो व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे तारांच्या कुंपणाने वेढलेल्या एका शेतातून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, वनविभागापर्यंत याची माहिती पोहोचली आहे. त्यांच्याकडून चित्त्याला पुन्हा कुनो जंगलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा चित्ता कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहेर कसा पडला. चित्त्यांनाChittah हे अभयारण्य कमी पडत आहे का? याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पुढील माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news