राजस्थानात पत्नीला निर्वस्त्र करून गावातून धिंड काढली | पुढारी

राजस्थानात पत्नीला निर्वस्त्र करून गावातून धिंड काढली

जयपूर/नवी दिल्ली : पत्नीला सर्वांसमोर निर्वस्त्र करून तिची गावातून धिंड काढल्याचा राजस्थानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पतीसह चौघांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेवरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मणिपूरमधील दोघा महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. अशीच निर्दयी घटना राजस्थानात घडल्याचे गुरुवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून निदर्शनास आले आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह सासरच्या लोकांनी तिला निर्वस्त्र करून गावातून फिरवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सातजणांवर गुन्हा नोंदवून पतीसह चौघांना अटक केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button