Aditya-L1 Mission: ‘आदित्य-एल-१’ सूर्य मोहिमेपूर्वी इस्रोच्या अध्यक्ष, शास्त्रज्ञांनी केली प्रार्थना | पुढारी

Aditya-L1 Mission: 'आदित्य-एल-१' सूर्य मोहिमेपूर्वी इस्रोच्या अध्यक्ष, शास्त्रज्ञांनी केली प्रार्थना

पुढारी ऑनलाईन: चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपनानंतर उद्या (१ सप्टेंबर) भारताच्या पहिल्या सूर्यमोहिमेचे प्रक्षेपण करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांसह आंध्र प्रदेशातील चेंगलम्मा मंदिरात ‘आदित्य-एल-१’ मिशनसाठी प्रार्थना (ISRO Aditya-L1 Mission) केली, याचे वृत्त एएनआयने व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील चेंगलम्मा परमेश्वरी मंदिरात आज (दि.१ सप्टें) प्रार्थना केली. भारताची पहिली सूर्यमोहीम (आदित्य-L1 मिशन) उद्या २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होत आहे. यासाठी जगभरातील नागरिकांसह अनेक भारतवासीय उत्सुक (ISRO Aditya-L1 Mission) आहेत.

Aditya-L1 Mission: इस्रोचे पुढील मिशन ‘गगनयान’ ऑक्टोबरमध्ये

दरम्यान इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, आज ‘आदित्य-L1’ चे काउंटडाउन सुरू होत आहे. ते उद्या सकाळी 11.50 च्या सुमारास प्रक्षेपित होईल. आदित्य L1 उपग्रह आपल्या सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आहे. L1 बिंदूवर पोहोचण्यासाठी त्याला 125 दिवस लागतील. हे एक अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण आहे. चांद्रयान-4 विषयी आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही, परंतु आम्ही लवकरच चांद्रयान-४ मोहिमेची घोषणा करू. ‘आदित्य L1’ नंतर आमचे पुढील ध्येय हे ‘गगनयान’ चे प्रक्षेपण आहे, ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, असेही एस. सोमनाथ यांनी स्पष्ट केले (ISRO Aditya-L1 Mission) आहे.

हेही वाचा:

Back to top button