Rahul Gandhi : आर्यन तुरुंगात असताना राहुल गांधींचे शाहरूख खानला पत्र | पुढारी

Rahul Gandhi : आर्यन तुरुंगात असताना राहुल गांधींचे शाहरूख खानला पत्र

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील क्रूझवर ड्रग्ज सापडल्याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला अटक केली होती. आर्यन तुरुंगात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शाहरूखला पत्र लिहून त्याला धीर दिल्याचे समोर आले आहे. ( Rahul Gandhi to Shah Rukh Khan) 14 ऑक्टोबर रोजी राहुल गांधींनी हे पत्र लिहिले होते.

( Rahul Gandhi to Shah Rukh Khan) देश तुमच्यासोबत आहे

शाहरूखला लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी शाहरुख खान याच्‍या कुटुंबीयांना धीर दिला. देश तुमच्यासोबत असल्याचे राहुल गांधी या पत्रात नमूद केले होते.

दरम्यान, राहुल गांधींनी केंद्रावर टीका केली आहे. ट्विटमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, देशातील शेतकरी आणि व्यापारी केंद्र सरकारच्या वाईट धोरणांचे शिकार ठरले आहेत. अर्थव्यवस्थेची दुरुस्ती करून त्यांचे जीवन वाचवा. राहुल यांनी आकडेवारीही दिली आहे. त्यानुसार 2016 मध्ये 8573 व्यापार्‍यांनी आत्महत्या केली. 2017 मध्ये 7778, 2018 मध्ये 7990, 2019 मध्ये 9052 आणि 2020 मध्ये 11 हजार 716 व्यापार्‍यांनी आत्महत्या केली. तर शेतकर्‍यांनी याच सालांमध्ये क्रमशः 11 हजार 379, 10 हजार 655, 10 हजार 349, 10 हजार 281 आणि 2020 मध्ये 10 हजार 677 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.

हेही वाचलं का?

 

 

 

 

Back to top button