

[toggle title="पुढारी ऑनलाईन डेस्क" state="open"][/toggle]
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ३० ऑक्टोबरला आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला. आर्यन खानला एनसीबीने ड्रग प्रकरणी अटक केली होती, त्यानंतर शाहरुख खान आपल्या मुलाला जामीन मिळावा यासाठी कोर्टात केस लढत होता.
आर्यन खानला जामीन मिळवून देण्यासाठी शाहरुख खानला मुकुल रोहतगी आणि सतीश मानशिंदे यांसारख्या नामवंत वकिलांची फौज उभी करावी लागली, त्यानंतर त्याचा मुलगा तुरुंगातून बाहेर येऊ शकला.
गेल्या वीकेंडला तुरुंगातून बाहेर आलेल्या आर्यन खानकडे (Aryan Khan) आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत, येत्या काळात तो कपाळावरील हा डाग कसा दूर करणार? आर्यन खानच्या ताज्या निर्णयाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने इंस्टाग्रामवर असे काही केले आहे की सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
वास्तविक आर्यन खानने तुरुंगातून बाहेर येताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याचे प्रोफाईल पिक्चर डिलीट केले आहे. आर्यन खानच्या (Aryan Khan) या कृतीने कोट्यवधी चाहते नाराज झाले आहेत. तुरुंगातून आल्यानंतर आर्यन खानची प्रकृती बरी नसल्याचे सर्वांचे म्हणणे आहे, त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खान तिचा मुलगा आर्यन खानसाठी एक विशेष थेरपी सत्र आयोजित करणार आहे. गेल्या काही दिवसांत आर्यनसोबत घडलेल्या गोष्टींचा मनावर नकारात्मक परिणाम होणारच आहे. गौरीने आपल्या मुलाला पुन्हा नॉर्मल बनवण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्यन पुन्हा अशा प्रकरणात अडकू नये म्हणून शाहरुख खान आता आपल्या मुलावर बारीक नजर ठेवण्याचा विचार करत असल्याचे एका सूत्राने सांगितले.
हे ही वाचलं का?