

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : भिवंडीत लव्ह जिहाद प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून संबंधिताविरोधात बलात्कारासह विविध कलमांतर्गत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू ऊर्फ सिराज कुरेशी (रा. गैबीनगर, भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पतीपासून अलिप्त राहत असलेल्या 27 वर्षीय हिंदू महिलेशी एका मुस्लिम व्यक्तीने हिंदू असल्याचे खोटे सांगून आधी सोशल मीडियावर मैत्री केली. नंतर प्रेमाच्या आणाभाका घेत हिंदू पद्धतीने विवाहही केला. नंतर आपल्यासोबत राहायचे असल्यास इस्लाम धर्म स्वीकारून मुस्लिम पद्धतीने निकाह करण्याचा आग्रह पतीने धरला. प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने दोन वर्ष त्याच्यासोबत राहून त्यानंतर एका कागदावर तिच्याकडून तलाक दिल्याचे लिहून घेतले. आपला पती आधीपासूनच विवाहित असून, चार अपत्यांच्या पिता असल्याची बाब समोर आल्यानंतर या महिलेची मुलगी आजारी पडत असल्याने तिला दर्ग्यावर घेऊन जाण्याचा सल्ला काहींनी दिला होता. यावेळी तिची राजूशी ओळख झाली होती.
हेही वाचा :