गगनयानसोबत अवकाशात झेपावणारी महिला रोबोट ‘व्योममित्रा’ आहे तरी काय? | Vyommitra | पुढारी

गगनयानसोबत अवकाशात झेपावणारी महिला रोबोट 'व्योममित्रा' आहे तरी काय? | Vyommitra

चांद्रयाननंतर भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम | Vyommitra

पुढारी ऑनलाईन डेस्क : चांद्रयान ३च्या विश्वविक्रमी यशानंतर अवकाशात महिला रोबोट पाठवण्यात येणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. गगनयान मोहिमेत स्पेसक्राफ्टमध्ये व्योममित्रा असणार आहे. ही व्योममित्रा एक ह्युमनाईड रोबोट असून तिची निर्मिती इस्रोने केली आहे. इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिटमध्ये या २०२०साली या रोबोटच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. (Vyommitra)

जितेंद्र सिंग यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात ही घोषणा केली. त्यानंतर व्योममित्राबद्दल अनेकांच्या मनात कुतुहल निर्माण झाले आहे.
गगनयान या अंतराळ मोहिमेत यात व्योममित्रा ही महिला रोबोट असणार आहे. हा रोबोट ह्युमनाईड आहे. इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिटमध्ये या रोबोटमध्ये यांत्रिक मेंदू बसवण्यात आला आहे. हो रोबोट गगनयानच्या स्पेसक्राफ्टमधील कंट्रोल पॅनल वाचू शकतो आणि इस्रोच्या मुख्य केंद्राशी संपर्क साधू शकतो, अशा माहिती इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिटचे संचालक सॅम दयाल यांनी २०२०साली द हिंदू या वृत्तपत्राला दिली होती. (Vyommitra)

या ह्युमनाईड रोबोटला पाय नाहीत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्राचा वापर करून हा रोबोट बनवला आहे. रॉकेटचे धक्के सहन करण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे. इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिटने या रोबोटचे डिझाईन आणि इंटिग्रेशनचे काम पूर्ण केले आहे. तर विक्रम साराभाई स्पेस सेंटरने या रोबोटच्या बोटांची निर्मिती केली आहे. चेहऱ्यावर माणसांसारखे हावभाव हे या रोबोटचे एक वैशिष्ट्य आहे.

या रोबोटमध्ये एक प्रकारचा बुद्ध्यांक आहे. कंट्रोल पॅनल वाचणे, तो नियंत्रित करणे आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे ही कामे हा ह्युमनाईड करू शकतो.

हेही वाचा

Back to top button