पुणे : रोबोटिक आर्मच्या साह्याने ससूनमध्ये पहिली शस्त्रक्रिया | पुढारी

पुणे : रोबोटिक आर्मच्या साह्याने ससूनमध्ये पहिली शस्त्रक्रिया

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ससून रुग्णालयात मंगळवारी रोबोटिक आर्मच्या साह्याने राज्यातील पहिली शस्त्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर पार पडली. व्यवसायाने शेफ असणार्‍या 22 वर्षीय पुरुषाची अ‍ॅपेंडिक्सची शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अमेय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी यशस्वीरीत्या केली. मेंदू आणि हृदय वगळता इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया रोबोटिक आर्मच्या साह्याने करता येणार आहेत. सध्या रोबोटिक सर्जरीबाबत देशात विविध प्रयोग केले जात आहेत. मात्र, रोबोटिक सर्जरी अतिशय महाग असते. लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरी यांचा सुवर्णमध्य म्हणून रोबोटिक आर्म शस्त्रक्रियेकडे पाहिले जात आहे.

यापूर्वी अहमदाबादला रोबोटिक आर्मच्या साह्याने पहिली शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिया करताना सर्जनचा हात 360 अंशांमध्ये फिरू शकत नाही. त्याऐवजी रोबोटिक आर्मचा वापर केल्याने शस्त्रक्रियेमध्ये अचूकता, वेग असे लाभ होत असून, सामान्य शस्त्रक्रियेच्या तुलनेत नवीन प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी निम्म्याहून कमी वेळ लागल्याचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अमेय ठाकूर यांनी सांगितले. मेंदू, हृदय वगळता हर्निया, गॅल ब्लॅडर तसेच पोटाच्या, गायनॅकॉलिजकल, अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया रोबोटिक आर्मच्या साह्याने होऊ शकणार आहेत.

रोबोटिक आर्मविषयी :
वापीतील मेरिल एंडो सर्जरी या कंपनीच्या वतीने 36 सेंटिमीटरचा रोबोटिक आर्म तयार करण्यात आला आहे. यामध्ये नीडल होल्डर, मोनोपोलार हूक, ग्रास्पर, स्पॅट्यूला अशा विविध उपकरणांचा समावेश आहे. मोनोपोलार हूकऐवजी अल्ट्रा सोनिक पध्दत वापरता येईल का? याबाबत बदल करून पाहिला जाणार आहे. लॅप्रोस्कोपिक सर्जनला रोबोटिक आर्म वापरण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज भासणार नाही.

यांचा सुवर्णमध्य म्हणून रोबोटिक आर्म शस्त्रक्रियेकडे पाहिले जात आहे. यापूर्वी अहमदाबादला रोबोटिक आर्मच्या साह्याने पहिली शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिया करताना सर्जनचा हात 360 अंशांमध्ये फिरू शकत नाही. त्याऐवजी रोबोटिक आर्मचा वापर केल्याने शस्त्रक्रियेमध्ये अचूकता, वेग असे लाभ होत असून, सामान्य शस्त्रक्रियेच्या तुलनेत नवीन प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी निम्म्याहून कमी वेळ लागल्याचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अमेय ठाकूर यांनी सांगितले. मेंदू, हृदय वगळता हर्निया, गॅल ब्लॅडर तसेच पोटाच्या, गायनॅकॉलिजकल, अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया रोबोटिक आर्मच्या साह्याने होऊ शकणार आहेत.

रोबोटिक आर्म महिनाभर विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये वापरून पाहिला जाणार आहे. त्यामध्ये काय बदल करावे लागतील? याचा अभ्यास करून त्याप्रमाणे अभिप्राय दिला जाईल. रोबोटिक आर्म उपयुक्त वाटल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
                        – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

Back to top button