HSL Defence Deal : संरक्षण मंत्रालयाचा HSL सोबत ५ युद्धनौकांसाठी करार; नौदलाला मोठा फायदा; सागरी सुरक्षा वाढणार

HSL Defence Deal
HSL Defence Deal

पुढारी ऑनलाइन डेस्क : HSL Defence Deal: भारतीय संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी HSL (हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, विशाखापट्टणम्) सोबत भारतीय नौदलासाठी सुमारे १९ हजार कोटी रुपयांच्या एकूण पाच युद्धनौका (फ्लीट सपोर्ट शिप-FSS) अधिग्रहणाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला आहे. या कराराबाबत एसएसएलचे एमडी कमोडोर हेमंत खत्री (निवृत्त) म्हणाले की, आजचा दिवस खूप मोठा आहे. ज्या जहाजांसाठी हा करार करण्यात आला आहे ती जहाजे आकार आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगत आहेत. संरक्षण मंत्रालयाने एचएसएलसोबत केलेल्या करारामुळे भारतीय नौदलाला खूप फायदा होईल.

HSL Defence Deal : सागरी सुरक्षा वाढणार – व्हाइस अॅडमिरल संजय सिंग

या प्रसंगी भारतीय नौदलाचे उपाध्यक्ष व्हाइस अॅडमिरल संजय सिंग यांनी याविषयी एएनआयशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले पाच फ्लीट सपोर्ट जहाजे मालवाहू क्षमता वाढवतील आणि हिंद महासागरातील सर्व क्षेत्रांमध्ये सागरी सुरक्षा वाढवतील. फ्लीट सपोर्ट शिप (FSS – युद्धनौका) ची सध्याची शैली, ज्यावर आज स्वाक्षरी करण्यात आली, त्यामध्ये पाच टँकरसह सुमारे २५ हजार टन मालवाहतूक केली जाईल. आम्हाला खात्री आहे की आम्ही हिंद महासागरातील सर्व भागात उपस्थिती आणि पाळत ठेवण्यास आणि सागरी सुरक्षेला प्रोत्साहन देऊ शकू.

HSL Defence Deal : रोजगाराच्या मोठ्या संधी – अॅडमिरल किरण देशमुख

नौदलाचे युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक (CWPA) व्हाईस अॅडमिरल किरण देशमुख म्हणाले की २० हजार कोटी रुपयांच्या या करारामुळे १७० लाख मनुष्य दिवसांच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. "आज तुम्ही पाच जहाजे मोजली. मात्र आम्ही २० हजार कोटी रुपयांचे करारही केले आहेत. यामुळे १७० लाख मनुष्यदिवसांचा रोजगार निर्माण होईल," देशमुख म्हणाले.
आतापर्यंत आम्ही १.५ लाख कोटी रुपयांचे जहाज बांधणीचे करार हाताळत आहोत जे या आधीच पूर्ण झाले आहेत. मला खात्री आहे की हे आत्मनिर्भरतासाठी सरकारच्या निर्देशानुसार आहे. तसेच मला खात्री आहे की २०४७ पर्यंत ते आम्हाला १००% स्वावलंबनाच्या आमच्या प्रमुख उद्दिष्टाकडे घेऊन जाईल.

HSL Defence Deal : भारतीय शिपयार्डद्वारे भारतात बांधली जाणारी पहिलीच जहाजे

या कराराविषयी आणखी माहिती देताना एका संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले की, संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने ही मोठी चालना असेल कारण ही जहाजे एचएसएल, विशाखापट्टणमद्वारे स्वदेशी डिझाइन आणि तंत्रज्ञानाने बांधली जातील. तपशील देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४४ हजार टन वजनाची ही जहाजे भारतीय शिपयार्डद्वारे भारतात बांधली जाणारी पहिलीच जहाजे असणार आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news