ऑस्ट्रेलियातील गुहेत इंडोनेशियन युद्धनौकांचे भित्तीचित्र

ऑस्ट्रेलियातील गुहेत इंडोनेशियन युद्धनौकांचे भित्तीचित्र

कॅनबेरा ः शेकडो वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील मूळनिवासी असलेल्या आदिवासींनी एका गुहेच्या भिंतीवर दोन नौकांचे चित्र रंगवले. 50 वर्षांपूर्वी या भित्तीचित्रांचा शोध लागला आणि त्यावेळेपासूनच या नौकांचे मूळ शोधण्यात पुरातत्त्व संशोधक गुंतून राहिले. आता एका नव्या संशोधनातून या नौकांचे रहस्य उलगडण्यात यश आले. या नौका म्हणजे सध्याच्या इंडोनेशियाच्या युद्धनौका असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. कदाचित शेकडो वर्षांपूर्वी इंडोनेशियातून आलेल्या अशा युद्धनौकांमधील लोकांचा स्थानिक आदिवासी लोकांशी संघर्ष झालेला असावा, असे अनुमान आहे.

या नौका मोलुक्कस किंवा मालुकु आयलंडस्च्या आहेत. इंडोनेशियाच्या पूर्व तटाजवळील हे बेट ऑस्ट्रेलियाच्या थेट उत्तरेकडे आहे. 'हिस्टॉरिकल आर्कियोलॉजी' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीतील पुरातत्त्व संशोधक डेरील वेस्ले यांनी सांगितले की या दोन नौकांनी उत्तर ऑस्ट्रेलियाच्या अन्य जगाशी असलेल्या संपर्काचा परिघ अचानक वाढवला. यापूर्वीही मोलुक्कन्स लोकांचा ऑस्ट्रेलियातील अ‍ॅबोरिजिनल लोकांशी संपर्क होता याची माहिती होती.

मात्र, मोलुक्कसमधून आलेल्या युद्धनौकांना अ‍ॅबोरिजिनल लोकांनी कातळचित्रांच्या माध्यमातून असे जतन करून ठेवले असल्याचे माहिती नव्हते. या युद्धनौकांची अनेक वैशिष्ट्ये या चित्रांमधून दिसून येतात. त्यामध्ये त्यांचे त्रिकोणी ध्वज, पताका, सजावट यांचा समावेश होतो. व्यापारी किंवा मासेमारीच्या नौकांच्या तुलनेत अशा नौका वेगळ्या ठरतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news