‘भाजप फॅसिस्ट’ म्हणणे हा गुन्हा होऊ शकत नाही : उच्च न्यायालय | Fascist BJP slogan

‘भाजप फॅसिस्ट’ म्हणणे हा गुन्हा होऊ शकत नाही : उच्च न्यायालय | Fascist BJP slogan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फॅसिस्ट भाजप अशी घोषणा देणे हा गुन्हा होऊ शकत नाही, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. लोईस सोफिया या तरुणीविरोधातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. (Fascist BJP slogan)

लोईस सोफिया यांनी भाजप सरकार विरोधात विमानात घोषणाबाजी केली होती. भाजपचे तामिळनाडूतील तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल तामिळसाई सुंदरराजन या विमानात होते, त्यांच्या समोरच लोईस यांनी ही घोषणाबाजी केली होती. Live Law या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई घटनापीठाचे न्यायमूर्ती पी. धनबाल म्हणाले, "फॅसिस्ट भाजप म्हणणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. ही शुल्लक बाब आहे. भारतीय दंड संहितेतील कलम २९०चा भंग होईल, असे प्रकरणात काही नाही." सार्वजनिक शांतता धोक्यात आणण्यासाठीचे हे कलम आहे.

हे प्रकरण २०१८चे आहे. यात भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्षांच्या वतीने के. अन्नामलाई यांनी बाजू मांडली. या प्रकरणात पोलिसांनी हवाई सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा नोंद केला नाही, अशी मांडणी त्यांनी केली. पण न्यायमूर्ती म्हणाले, "या प्रकरणात कोणाताही हिंसाचार झालेला नाही, काही शब्द उच्चारले म्हणजे विमानाची सुरक्षा धोक्यात आली असे होत नाही."

पोलिसांनी सुरुवातीला दोन अदखल पात्र गुन्हे नोंद केले होते, त्यानंतर एक दखलपात्र गुन्हा हस्तलिखितात नोंद केला होता, यावर न्यायालयाने ताशेरे ओढले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news