

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराने आज गुरुवारी तेजीत सुरुवात केली. विशेष म्हणजे बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ४५० हून अधिक अंकांनी वाढून ६५,९०० वर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) १२१ अंकांच्या वाढीसह १९,५६७ वर गेला. बाजारातील तेजीत बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर आहेत. (Stock Market Opening Bell)
जियो फायनान्सियलचा शेअर वगळता सर्व शेअर्सनी हिरव्या चिन्हात सुरुवात केली आहे. जियो फायनान्सियलचे लोअर सर्किट कायम आहे. दरम्यान, बाजारातील बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, इन्फोसिस हे शेअर्स तेजीत आहेत.
चांद्रयान- ३ मोहिमेच्या यशामुळे (Chandrayaan-3 Lands On Moon) स्पेस स्टॉक्स तेजीत आहेत. अंतराळ क्षेत्रासाठी उपकरणे पुरवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढत आहे. काल बुधवारी या क्षेत्रातील काही शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत वाढले. यामुळे त्यांच्या बाजार भांडवलात १३ हजार कोटींची वाढ झाली आहे. ३ लाख ८४ हजार कि.मी.चे अंतर कापून चंद्रापर्यंत पोहोचलेल्या 'चांद्रयान-३'ने बुधवारी इतिहास रचला. चंद्रावर तिरंगा फडकला. चांद्रयानाच्या 'विक्रम' लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय टेकवले आणि अवघा देश आनंदाने बेभान झाला. 'इस्रो'च्या मुख्यालयात श्वास रोखून धरलेल्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी आनंदाने एकच जल्लोष केला. याचा पॉझिटिव्ह ट्रेंड शेअर बाजारातही दिसून येत आहे. (Stock Market Opening Bell)
हे ही वाचा :