Chandrayaan 3 : आज पुन्‍हा झाले ‘त्‍या’ अश्रूंचे स्‍मरण, अपयशातून ‘इस्रो’ची यशाकडे उत्तुंग भरारी… | पुढारी

Chandrayaan 3 : आज पुन्‍हा झाले 'त्‍या' अश्रूंचे स्‍मरण, अपयशातून ‘इस्रो’ची यशाकडे उत्तुंग भरारी...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चांद्रयान-३ मोहिम फत्ते करत आज अंतराळ संशोधनाच्‍या इतिहासात सुवर्णक्षरात आपल्‍या कामगिरीची नोंद केली आहे. आज सर्वत्र ISROच्‍या कामगिरीचे कौतुक होत आहे. संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचवावी अशी ही कामगिरी आहे. या यशाबरोबरच २०१९ मध्‍ये चांद्रयान २ मोहिम अपयशी ठरल्‍यानंतर इस्‍त्रोचे तत्‍कालिन अध्‍यक्ष के सिवन यांना अश्रू अनावर झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या भाषणानंतर त्‍यांच्‍या भावनांचा बांध फुटला होता. आज चांद्रयान ३चे यश सादरे हेत असताना चार वर्षांपूर्वीच्‍या सिवन यांच्‍या अश्रूंचे स्‍मरण सर्वांना होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे माजी प्रमुख के. शिवन यांना मिठी मारली आणि त्यांना थाप दिल्याची दृश्याचे स्‍मरण आज पुन्‍हा एकदा झाले आहे. (Chandrayaan 3)

Chandrayaan 3 : काय घडलं होते?

दिवस होता ६ सप्‍टेंबर २०१९. चांद्रयान मोहिम २ साठी इस्रो सज्‍ज होते. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-2 च्या विक्रम मॉड्यूलला सॉफ्ट लँड करण्याची इस्रोची योजना स्क्रिप्टनुसार पूर्ण झाली नाही, लँडरने त्याच्या अंतिम उतरण्याच्या वेळी ग्राउंड स्टेशनशी संपर्क गमावला. इस्रोने शास्त्रज्ञांना संबोधित केल्यानंतर काही तासांनंतर त्याचा लँडरशी संपर्क तुटल्याचे जाहीर केले होते. अखेरच्‍या क्षणी विक्रम लँडशी संपर्क तुटला आणि देशभरातील खगोल प्रेमींमध्‍ये निराशा पसरली. चांद्रयान 2 लँडर ‘विक्रम’ चा चंद्रावर उतरण्याच्या वेळीच अंतराळ संस्थेचा संपर्क तुटल्याने सिवन प्रचंड निराश झाले होते.

स्थिर रहा आणि पुढे पाहा … पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले प्रेरणेचे शब्‍द

चांद्रयान -2 मोहिम अयशस्‍वी ठरल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मला तुमची मनाची चौकट समजली, तुमच्या डोळ्यातील नजर खूप काही सांगून गेली. त्यामुळेच मी इथे फार काळ थांबलो नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही कदाचित चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलो नसतो… तुम्ही शक्य तितके जवळ आलात, स्थिर रहा आणि पुढे पहा.” आपल्या भाषणानंतर मोदींनी शास्त्रज्ञांशी हस्तांदोलन करत प्रोत्साहनाच्या शब्दांत त्यांना पुढे पाहण्यास सांगितले आणि हिंमत गमावू नका असे सांगितले.

इस्‍त्रोचे तत्‍कालिन अध्‍यक्ष के सिवन अश्रू रोखू शकले नाहीत

यावेळी मोदींच्या प्रेरणेचे शब्द असूनही इस्‍त्रोचे तत्‍कालिन अध्‍यक्ष के सिवन अश्रू रोखू शकले नाहीत. बेंगळुरूमधील इस्रोच्या मुख्यालयाच्या बाहेर अश्रूंनी भरलेल्या शिवनला मिठी मारताना आणि सांत्वन करताना मोदी दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही भावूक झाले.

हेही वाचा 

 

Back to top button