Chandrayaan-3 Mission | ब्रेकिंग! चांद्रयान-३ आजच चंद्रावर उतरणार; इस्रोने दिली मोठी अपडेट | पुढारी

Chandrayaan-3 Mission | ब्रेकिंग! चांद्रयान-३ आजच चंद्रावर उतरणार; इस्रोने दिली मोठी अपडेट

पुढारी ऑनलाईन : भारतीय चांद्रयान-३  मोहीमेकडे अवघ्या विश्वाचे लक्ष वेधले आहे. आत्तापर्यंतचे सर्व टप्पे चांद्रयानाने यशस्वीरित्या पार पाडले आहेत. आज (दि.२३ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांचा विक्रम लँडर लँडिंगचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा आहे. दरम्यान, चांद्रयान-३ चे लॅँडर मॉड्यूल आजच चंद्रावर उतरणार असल्याची माहिती इस्रोने (Chandrayaan-3 Mission) दिली आहे. यासंदर्भात इस्रोने एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (ALS) सुरू करण्यासाठी सर्व तयार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर निश्चित केलेल्या बिंदुवर लँडर मॉड्यूल (LM) च्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. हे लँडर मॉड्यूल आज सायंकाळी ५ वाजून, ४४ मिनिटांनी निश्चित केलेल्या बिंदूवर येऊन लँडिंग प्रक्रियेला सुरूवात करेल असे इस्रोने सांगितले आहे.यासंदर्भातील लाईव्ह थेट प्रक्षेपण ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल, असेही इस्रोने (Chandrayaan-3 Mission) म्हटले आहे.

chandryan 3 Messeges: चांद्रयान-३ मोहीम पाहा लाईव्ह

ISRO वेबसाइट – https://www.isro.gov.in/
ISRO यूट्यूब – https://www.youtube.com/@isroofficial5866/about
ISRO फेसबुक – https://www.facebook.com/ISRO/
डीडी नॅशनल टीव्ही- https://www.youtube.com/@DoordarshanNational

Chandrayaan-3 Mission: लँडिंग तारीख आणि वेळेत करण्यात येणार होता बदल?

यापूर्वी २० ऑगस्टला विक्रम लँडर लँड होताना काही अडथळा आल्यास चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरच्या लँडिंग वेळेत बदल होऊ शकतो. २३ ऑगस्टला अडथळे आल्यास २७ ऑगस्टला लँडरला चंद्रावर उतरवणार असे इस्रोने म्हटले होते. परंतु आता इस्रोने सर्व काही पोषक असून, चांद्रयान-३ चे आजच लँडिग होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

 

 

 

Back to top button