चंद्रावर उतरणाऱ्या यानामुळे भारत जगात इतिहास घडवेल | पुढारी

चंद्रावर उतरणाऱ्या यानामुळे भारत जगात इतिहास घडवेल

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय यान आज सायंकाळी सहा वाजता चंद्रावर उतरणार आहे. इस्रोने हे मिशन यशस्वीरित्या पार पाडेल त्यामुळे भारत जगात इतिहास घडविणारं आहे, असा विश्वास स्काय वॉच गृपचे सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला. सायंकाळच्या चंद्रावर उतरणाऱ्या यानाचे प्रक्षेपन सर्वांनी पाहून वैज्ञानिक जागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.

भारताचा चांद्रयान आज बुधवारी  सायंकाळी सहा वाजता चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे भारतीयांकरिता गौरवाचा क्षण आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेकडे लागले आहे. प्रपोशन मॉडेल व लँडर आणि रोअर  यांची स्थिती खूप चांगली आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे. लँडर सायंकाळी हळूहळू चंद्रावर खालच्या अर्बिटमध्ये उतरण्याचा प्रयत्न करेल. उतरल्यानंतर काहीच वेळात रोअर बाहेर येऊन सौर ऊर्जेच्या माध्यमाने ते चालेल. उद्या चंद्रावर दिवस उगवेल आणि चौदा दिवस पर्यंत त्या ठिकाणी सूर्यप्रकाश राहील. चौदा दिवसांची ही मोहीम आहे.
14 दिवसानंतर जेव्हा सूर्यास्त होवून अंधार होईल तेव्हा ही मोहीम थांबेल. कदाचित नंतर पुन्हा महिनाभराने हे मोहीम सुरू होईल. या काळात प्रपोशन मॉडेल चंद्राच्या आरबिट मध्ये फिरत राहील. या काळातील छायाचित्रे पण मिळतील. भारताकरिता इस्रोची ही अतिशय चांगली मोहीम आहे. ही यशस्वी झाली तर भारत चंद्रावर चांद्रयान उतरविनारा चौथा देश ठरेल तर दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरविणारा पहिला देश ठरेल.
संपूर्ण जगाचे लक्ष या वैज्ञानिक घटनेकडे लागले आहे. यापूर्वी रशियाने चंद्रयान उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो दक्षिण ध्रुवावर अक्षरश आढळला गेला, त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रावर उतरविल्या जाणाऱ्या यानाची यशस्वी तयारी केलेली आहे. चंद्रयान यशस्वीरीत्या उतरेल आणि यानाद्वारे चंद्राच्या भूपृष्ठची, भूगर्भाची, वातावरणाची, अवकाशीय खनिजे आणि विविध स्वरूपाची चंद्रावरील माहिती मिळणार आहे. त्यामुळे भारत जगात इतिहास घडवेल असा विश्वास त्यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केला.
सायंकाळी पाच ते साडेसहा वाजता पासून याचे प्रक्षेपण सुरू होणार आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ही घटना सर्वांना प्रक्षेपणाच्या माध्यमातून बघणे महत्त्वाची आहे. त्यामुळे या घटनेचे प्रक्षेपण पाहून वैज्ञानिकदृष्ट्या जागृती करावी करावी असे आवाहन स्काय वॉच गृपचे अध्यक्षांनी  माहिती दिली.
.हेही वाचा 

Back to top button