दोन वर्षांत भारत जी-२० देशांना मागे टाकेल; मूडीज इन्व्हेस्टमेंटचा अहवाल | पुढारी

दोन वर्षांत भारत जी-२० देशांना मागे टाकेल; मूडीज इन्व्हेस्टमेंटचा अहवाल

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चलनवाढ रोखण्यावर भर देणारे प्रभावी प्रयत्न, वित्तीय यंत्रणेचे सुधारणांच्या मदतीने केलेले पुनर्वसन यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या धोरणांची परिणामकारकता वाढली असून आगामी दोन वर्षांत भारताचा विकास जी-20 मधील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकेल, असे मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेसने म्हटले आहे. विकासाच्या गतीमुळे उत्पन्नाच्या स्तरात वाढ होईल, असेही मूडीजने म्हटले आहे.

आपल्या अहवालात मूडीजने पुढे म्हटले आहे की, गेल्या 7 ते 10 वर्षांत भारताच्या संभाव्य विकासाचा वेग खाली असला तरी आगामी काळात विशेष करून येत्या दोन वर्षांत विकासाच्या बाबतीत भारत जी-20 मधील इतर अर्थव्यवस्थांना मागे टाकेल. हे देशांतर्गत मागणीच्या बळावर होऊ शकते. चलनवाढ रोखण्यावर भर देणारे प्रभावी प्रयत्न, वित्तीय यंत्रणेचे सुधारणांच्या मदतीने केलेले पुनर्वसन यामुळे कोव्हिड नंतरच्या काळात वाढ सद़ृढ व मजबूत होईल. भारताच्या विकासाबाबत मुडीजने दिलेल्या बीएएए 3 या श्रेणीचे समर्थन केले असले तरी भारतीय अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हटले आहे.

मूडीजने पुढे म्हटले आहे की, पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकार भर देत असल्याने त्यामुळे दळणवळणात सुधारणा दिसून येत आहे. तसेच त्याचा व्यापार व परिवहनाशी संबंधित पायाभूत सुविधांवरही चांगला परिणाम होत आहे. रिझर्व्ह बँकेने कठोर धोरण ठेवल्याने चलनवाढीत घट झाल्याचेही म्हटले आहे.

राजकीय तणाव

विविध समुदायातील तणाव, राजकीय धोक्यांचे कमकुवत मूल्यांकन यामुळे राजकीय विरोध वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मूडीजने म्हटले आहे की, राजकीय ध्रुवीकरण वाढल्याचा सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होत नसला तरी देशांतर्गत राजकीय तणाव हा लोकप्रिय धोरणांबाबत दिसून येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button