पोटनिवडणूक : ‘या’ राज्यांत भाजपने गमावल्या जागा; काँग्रेसला अच्छे दिन | पुढारी

पोटनिवडणूक : ‘या’ राज्यांत भाजपने गमावल्या जागा; काँग्रेसला अच्छे दिन

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील १४ राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ( पोटनिवडणूक )भाजपला जोरदार झटका बसला आहे. १४ राज्यांत ३ लोकसभा आणि २९ विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी झाली. पश्चिम बंगालमध्ये हातातील दोन जागा मगावल्या तसेच हिमाचल प्रदेशातही भाजपला झटका बसला आहे. काँग्रेसनेही तोडीस तोड उत्तर देत चांगल्या जागा मिळविल्या आहेत.

मध्यप्रदेश, आसाम और तेलंगना या तीन राज्यांत भाजपला थोडासा दिलासा मिळाला आहे. मध्यप्रदेशातील खंडवा येथील मध्यप्रदेशातील खंडवा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ज्ञानेश्वर पाटील यांनी विजय मिळविला. तर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा सिंग यांनी भाजपला धूळ चारली.

बहुचर्चित आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरलेली दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात कमलाबेन डेलकर यांनी ५१ हजार मतांनी विजय मिळविला आहे. मध्यप्रदेशात विधानसभेच्या दोन जागांवर भाजप तर एका जागेवर काँग्रेस विजयी झाले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने दोन्ही जागांवर विजय मिळविला आहे. बिहारमध्ये जेडीयूने कुशेश्वर स्थान आणि तारापूरच्या जागा खिशात टाकत राजदला झटका दिला.
पश्चिम बंगालमध्ये दिनहाटा, शांतीपूर, गोसाबा आणि खरदा या चारही जागांवर भाजपला धूळ चारत तेथे तृणमूल काँग्रेसने विजयी पताका फडकावली.

आसाममध्ये गोसाईंगाव येथे यूपीपीएल, भवानीपूर, मरियानी आणि थोवरामध्ये भाजप, तामूलपूरमध्ये यूपीपीएलने विजय मिळविला.
आंध्रप्रदेशात बदवेल येथे वायएसआर काँग्रेसने विजय मिळविला. हरियाणात ऐलनाबादची जागा इनेलो पक्षाने राखत भाजपला पराभूत केले आहे. तेलंगनामध्ये हुजुराबाद विधानसभा निवडणुकीत तेलंगना राष्ट्र समितीने भाजपविरोधात उमेदवार दिला मात्र, तेथे भाजपने विजय मिळविला. कर्नाटकात हंगलमध्ये काँग्रेस तर सिंदगी येथे भाजपने विजय मिळविला.

पोटनिवडणूक : महाराष्ट्रात काँग्रेसला बळ

देगलूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध जितेश अंतापूरकर यांच्यात लढत होती. पहिल्या फेरीपासून अंतापूरकर आघाडीवर होते. येथे भाजपचा मोठा पराभव झाला.

मेघालय, मिझोराममध्ये काँग्रेसचा पराभव

मेघालयातील मॉरिंगकेंगमध्ये एनपीपी, मॉफलांगमध्ये यूडीपी तर राजबाला येथे एनपीपीने काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. मिझोरामध्ये तुईरियलमध्ये एनएनएफने जोरम पिपल्स मुव्हमेंट पार्टीचा पराभव केला.

हेही वाचा : 

Back to top button