पुणे : नेहाने फेसबुकवर राजस्थानमधील भटकंतीची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आणि तिने टिपलेली काही छायाचित्रांची विक्रीही झाली….नेहाप्रमाणे सध्या अनेक तरुण छायाचित्रकार पर्यटनावर आधारित छायाचित्रणाकडे वळले असून, त्यांच्या पर्यटनावरील छायाचित्रांना सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. 20 ते 40 वयोगटातील छायाचित्रकार ठिकठिकाणी भटकंती करून अशी छायाचित्रे टिपत असून, इन्स्टाग्राम, फेसबुक, टि्वटरवर लेह-लडाखपासून ते केरळपर्यंत…दुबईपासून ते मालदीवपर्यंत…अशा विविध ठिकाणी भटकंती करून टिपलेल्या छायाचित्रांना प्रतिसाद मिळत आहे. अनेकांसाठी पर्यटनावरील छायाचित्रण करिअरचे माध्यम बनले आहे.