Journalist Murder : बिहारमधील पत्रकाराच्या हत्याप्रकरणी चार आरोपींना अटक | पुढारी

Journalist Murder : बिहारमधील पत्रकाराच्या हत्याप्रकरणी चार आरोपींना अटक

पुढारी ऑनलाईन: बिहारमधील अररिया जिल्ह्यातील राणीगंज येथे पत्रकाराची गोळ्या झाडून काल (दि.१८) सकाळी हत्या करण्यात आली होती. विमल यादव असे या पत्रकाराचे नाव होते. या प्रकरणी ८ संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. यामधील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. ( Journalist Murder) या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

बिहारमधील राणीजंग येथील पत्रकार विमल यादव (३६) याला घराबाहेर बोलवत, गेटवरून चढून विमल यांच्या छातीत अज्ञातांकडून गोळ्या घालण्यात आल्या. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आणि तणाव निर्माण झाला होता. या घटनेची ( Journalist Murder) माहिती मिळताच बिहार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत शोधमोहीम सुरू केली होती.

बिहार पोलिसांनी आज माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पत्रकाराच्या हत्याप्रकरणी विपिन यादव, भावेश यादव, आशिष यादव आणि उमेश यादव या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर रुपेश यादव आणि क्रांती यादव हे अररिया कारागृहात असून, ते देखील या हत्येत सहभागी होते. त्यांना रिमांडवर घेतले जाणार असून, आणखी दोन संशयित आरोपी अद्याप फरार ( Journalist Murder) असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button